मुंबई : कोरोनाचा नवीन प्रकार Omicron ने आपला कहर दाखवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 94 देशांमध्ये पसरलेला Omicron अजूनही शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. याविषयी बरीच माहिती समोर येतेय पण खात्रीशीर काहीही सांगितलं जात नाही.
आता प्राथमिक संशोधनानंतर, काही तज्ज्ञ हे जाणून घेण्यास सक्षम आहेत की ओमिक्रॉन डेल्टापेक्षा वेगाने का पसरतो. डब्ल्यूएचओने असा इशाराही दिला आहे की, ओमायक्रॉनची प्रकरणं 1.5 ते तीन दिवसांत दुप्पट होत आहेत.
डब्ल्यूएचओचे डॉक्टर माइक रायन म्हणतात की, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमधील स्पाइक प्रोटीनमध्ये बदल दिसून आलेत. याच ठिकाणी प्रोटीन ह्युमन सेल्स संपर्कात येतात. या कारणास्तव, हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा वेगाने पसरू शकतो. डॉक्टर माइक यांचा असा विश्वास आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या अनुवांशिक अनुक्रमात बदल दिसून आले आहेत, ज्यामुळेही तो वेगाने पसरत आहे.
आता या संशोधनादरम्यान हाँगकाँग विद्यापीठाने एक अभ्यास केला आहे. त्यांच्या वतीने असं सांगण्यात आले आहे की, ओमायक्रॉन हे डेल्टापेक्षा 70 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. याशिवाय, Omicron इतर प्रकारांपेक्षा कमी प्राणघातक सिद्ध होऊ शकतं यावरही अहवालात जोर देण्यात आला आहे. परंतु या अहवालाचा आढावा घेतला गेला नाही, त्यामुळे तो ठोस मानता येणार नाही.
आता या दाव्याबाबत डॉ. सत्यनारायण मानतात की, ज्या लोकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांना ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यांच्या मते या कठीण परिस्थितीत पुन्हा एकदा बूस्टर डोसचं महत्त्व वाढलं असून सर्व देशांनी या दिशेने विचार करायला हवा.