Interesting Facts : प्रत्येक जणांना कधी ना कधी हॉस्पिटलच्या (Hospital) पाया चढाव्याच लागतात. कधी नातेवाईकांसाठी, कधी स्वत:साठी तर कधी ओळखीपैकी कोणासाठी तरी आपण हॉस्पिटलमध्ये एकदा तरी जाऊन आलो आहोत. जर कोणी गेलं नसेल तर चांगली गोष्ट आहे. पण चित्रपटात (movie), रोजच्या टीव्ही सीरियलमध्ये (TV serial) आपण कधी ना कधी एखादा हॉस्पिटलमधील सीन पाहितो. त्यात ऑपरेशन थिएटरमध्ये (Operation theater) डॉक्टर निळ्या, हिरव्या रंगाचे कपडे घातलेले दिसतात. अच्छा आम्हाला सांगा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की एवढे रंग आहेत मग डॉक्टर (Doctor) निळ्या आणि हिरव्या (Blue and green) रंगाचे कपडे का घालतात. डॉक्टरांनी कुठल्या रंगाचे कपडे घालावे यामागे एक वैज्ञानिक कारण (scientific reason) आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्वी डॉक्टर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी पांढरे कपडे घालायचे. मात्र पुढे जाऊन साधारण 1914 मध्ये डॉक्टरांच्या कपड्यांचा रंग बदलला. पांढऱ्या रंगाऐवजी डॉक्टर हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये दिसू लागले. पुढे हाच डॉक्टरांचा ड्रेस कोड ट्रेंड (Dress code trends) झाला. आज काल काही रुग्णालयात तु्म्हाला डॉक्टर आणि नर्स (Nurse) निळ्या रंगाच्या कपड्यामध्ये दिसतात. (Why did doctors replace their white clothes with green and blue nmp)
हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऑपरेशन असतं तेव्हा डॉक्टर आणि नर्स आवर्जून हिरवे किंवा निळे कपडे घालतात. कारण या रंगामुळे डोळ्यांना आराम मिळतो, असं वैज्ञानिक कारण सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा - Video : ती बाईकवरुन चालली होती, तो थांबला आणि तिचा तोल गेला...
अनेक वेळा डॉक्टरांना ऑपरेशन थिएटरमध्ये बराच वेळ शस्त्रक्रिया करावी लागते. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला बराच काळ रक्तस्त्राव होतो. रक्ताचा रंग हा लाल असतो. लाल रंग जास्त काळ डोळ्यांसमोर राहिला तर त्यांच्या डोळ्यांवर खूप ताण येतो. त्यामुळे अनेकदा डॉक्टर शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेवर लक्षकेंद्र करता येतं नाही. म्हणून डॉक्टरांच्या डोळ्यांना आराम मिळावा म्हणून हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली.