मुंबई : कोरोना लसीपासून मिळालेलं संरक्षण शरीराला या व्हायरसपासून दीर्घकाळ संरक्षण देत नाही. तर एका नवीन अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, ही लस शरीराच्या स्वतःच्या प्रतिकारशक्तीपेक्षा या व्हायरसपासून चांगलं संरक्षण देते. हा व्हायरसपासून बदलत असला तरी, अशा स्थितीत शरीरात त्याविरुद्ध निर्माण झालेली प्रतिकारशक्तीही फार काळ काम करत नाही.
याचा अर्थ असा की जर तुम्हाला पुन्हा या व्हायरसचा संसर्ग टाळायचा असेल तर लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागेल. या अभ्यासात हे देखील आढळून आलं की, कोणती लस शरीराला कोरोना व्हायरसपासून किती काळ वाचवू शकते. चला मग जाणून घेऊया तुम्ही घेतलेला लस तुम्हाला किती संरक्षण देते.
'प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' (PNAS) चा हा अभ्यास 15 जून रोजी प्रकाशित झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी ही लस अँटीबॉडीपेक्षा चांगली प्रतिकारशक्ती प्रदान करते, त्यामुळे बूस्टर लस घेणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले आहे.
या अभ्यासातून असं दिसून आले आहे की, एकदा कोरोनाचा फटका बसल्यानंतर शरीरात निर्माण झालेली नैसर्गिक प्रतिकारशक्ती सरासरी 21.5 महिने संरक्षण देते. त्याच वेळी, Pfizer BioNtech आणि Moderna च्या mRNA लसीने नैसर्गिक संसर्गाच्या तुलनेत अँटीबॉडीजची पातळी वाढवण्यास मदत केली, ज्याने सुमारे 29.6 महिने कोरोना संसर्गापासून संरक्षण प्रदान केलं.
संशोधनादरम्यान, असे दिसून आले की ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांनी बनवलेल्या व्हायरल व्हेक्टर लसीने नैसर्गिक प्रतिकारशक्ती सारख्याच अँटीबॉडीजची निर्मिती केली. त्यांनी अनुक्रमे 22.4 महिने आणि 20.5 महिने संसर्गापासून संरक्षण केलं.
या संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारे, शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की, लसीचे दोन डोस घेणं कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसं नाही. त्याचा बूस्टर डोस निर्धारित वेळेनंतर घेणं आवश्यक आहे.