Heart Attack : गेल्या काही वर्षांमध्ये Gym करुनही अनेक सेलिब्रिटी (celebrity) असो किंवा खेळाडू (player) यांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. गेल्या महिन्यात प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना जिममध्ये(Gym) व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) गेल्या 37 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. बदलेली जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे तरुण पिढीमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशात जिम जाणारे कमी वयातील लोक Heart Attack चे शिकार होत आहेत. त्यामुळे तुम्हा आम्हाला हा प्रश्न पडला आहे की जिममध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य? जिम करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका आहे का?
या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आरोग्य तज्ज्ञांकडून (Health experts) यासंदर्भात माहिती मिळवली. जिम आणि हृदयविकार याचा काय संबंध आहे त्याबद्दल जाणून घेऊयात (trending news Risk of Heart Attack During Workout at Gym nm)
आम्ही आरोग्य तज्ज्ञांशी यासंदर्भात बोलो तर त्यांचा मते, गेल्या काही वर्षांपासून देशात बैठी जीवनशैलीचं (lifestyle) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना काळात गेल्या 2 वर्षात वर्क फ्रॉम होम (Work from home) करताना लोक तासंतास एका जागेवर बसून काम करत आहे. ऑफिसमध्येही अगदी 9 ते 10 तास एका जागेवर बसून लॅपटॉप (Laptop) किंवा पीसीसमोर काम केलं जातं आहे. या अशा जीवनशैलीला बैठी जीवनशैली म्हटलं जातं.
बैठी जीवनशैली सोबत अनेक अशा चुका लोक करत आहेत. ज्यात शरीराला कुठलाही व्यायाम न करणे. अगदी गाडी आणि लिफ्टमधून प्रवास त्यामुळे चालणे होत नाही. त्याशिवाय खाण्यापिण्याची चुकीची सवय अशामुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे.
आता आपण बोलूयात व्यायाम प्रेमी लोकांबद्दल. तर अनेक लोकांना अचानक जिमला जाऊन व्यायाम करण्याचा साक्षात्कार होतो. अशात फिट आणि बॉडी बनविण्यासाठी लोक जीममध्ये भरपूर वेळ घालवतात. बॉडी बनविण्याच्या नादात Heavy एक्साइज (Excise) करतात. ट्रेडमिलवर जास्त जास्त वेळ गतीने धावतात. या चुकीमुळे त्यांचा हृदयावर भार वाढतो. अशामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. तसंच तरुणामध्ये योग्य प्रकारे जिममध्ये व्यायाम न केल्यामुळे त्यात योग्य पद्धतीने आणि हेल्दी डाएट (healthy diet) न घेतल्यामुळे कमी वयात हृदय विकाराचा त्रास दिसून येत आहे.
हृदयविकाराचा झटका येण्यामागे हाइ ब्लड प्रेशर आणि हाइ कोलेस्ट्रॉल हे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय या सवयीसुद्धा हृदयविकारासाठी कारणीभूत असतात. जर तुम्हाला या सवयी असेल तर त्वरित ती सोडा.
1. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन
2. धूम्रपान (smoking)
3. मद्यपान (drinking)
4. अधिक तणाव घेण्याची सवय
5. जास्त फॅटयुक्त पदार्थांचं सेवन
6. एका जागेवर तासंतास बसून काम करणे
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)