Health Tips : ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी हे ड्रिंक्स ठरतील फायदेशीर

उच्च रक्तदाब हे हृदय रोग, स्ट्रोक आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढवू शकतो. 

Updated: Jun 17, 2022, 01:44 PM IST
Health Tips : ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी हे ड्रिंक्स ठरतील फायदेशीर title=

मुंबई : भारतात हृदयविकाराचा झटका येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे अनियंत्रित उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब. भारतातील प्रौढ व्यक्तींमध्ये रक्तदाबाच्या समस्येचं प्रमाण अधिक आहे. जीवनशैली, आहारातील बदल आणि औषधं उच्च रक्तदाब कमी करू शकतात. उच्च रक्तदाब हे हृदय रोग, स्ट्रोक आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढवू शकतो. 

उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी रक्तदाब नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. काही हेल्दी डिंक्स उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबाचा रस हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी ओळखला जातो. 2016 च्या संशोधनात असं आढळलं आहे की, हा रस सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यासाठी डाळिंबाचा 20 मिलीग्राम रस पुरेसा असल्याचं संशोधकांना आढळलं होतं.

नारळपाणी

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी नारळाचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. नारळाचं पाणी पिण्याने शरीराचं तापमान राखण्यास मदत होते. वेस्ट इंडियन मेडिकल जर्नलच्या म्हणण्यानुसार, नारळपाणी प्यायल्यामुळे सिस्टोलिक रक्तदाब 71 टक्के आणि डायस्टोलिक रक्तदाब 29 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होते. याचं कारण असं की नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असतं, जे आपल्या शरीरातील पोटॅशियमचा प्रभाव कमी करण्यास मदत करतं.

टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटोचा रस व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असून रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. दररोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 2019 च्या संशोधनानुसार, जपानी संशोधकांनी हृदयाच्या जोखमीच्या घटकांवर दररोज एक कप टोमॅटोचा रस पिण्याच्या परिणामाचं मूल्यांकन केलं. त्यांनी असा निष्कर्ष काढला की टोमॅटोचा रस डायस्टोलिक आणि सिस्टोलिक रक्तदाब दोन्ही सुधारण्यास मदत करतो.