मुंबई : या धकाधकीच्या जीवनात अनेक ताण तणाव असतात. मात्र
याबाबतची जागरूकता आजही लोकांमध्ये नाही. अनेकदा आपापल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या मनावर आणि शरिरावर ताण पडतो. त्यामुळे हे पुढचे 10 संकेत जाणून घ्या.
उदासी - तुमच्या आजूबाजूला गर्दी असली तरीही तुम्ही स्वतःला एकटे मसजता का? तुमच्या चेहऱ्यावर कोणतेच हाव - भाव नसतात. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या जीवनात काहीच आनंद नाही.
चिडचिडपणा : छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही चिडचिड करता का? सकाळी उठताना तुमचा जो मूड असतो तोच तुमचा मूड दिवसभर राहतो. अशावेळी तुम्हाला कुणासोबतच राहायचं नसतं एकट राहणं तुम्ही अधिक पसंद करता.
एकटेपणा : चिडचिड केल्यामुळे आजूबाजूची व्यक्ती आपल्यापासून दूर जातात. तसेच तुम्हालाही आपल्या जवळ कुणी आलेलं आपल्याला आवडत नाही. कोणत्याही कार्यक्रमांना जाण्याची इच्छा नसते.
भावना - या दिवसांमध्ये तुमच्या भावना खूप कमजोर झालेल्या असतात. यावेळी तुम्हाला कुणाला कुणीही काहीही बोललं तरीही वाईट वाटतं.
झोप कमी होणं : अशा मनस्थितीत झोप कमी लागणं हे मुख्य कारण असतं. सतत काही ना काही विचार करणं किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सतत रडत राहणं. यासारख्या गोष्टी रात्रीच्यावेळी केल्या जातात.
वजन कमी होणं : मानसिक स्वास्थ बिघडलं की त्याचा परिणाम शरिरावर होत असतो. अशावेळी तुम्ही डिस्टर्ब असताना वजन कमी होणं ही स्वाभिविक गोष्ट आहे.
व्यसनाधीन होणं : मनाचं स्वास्थ अधिक प्रमाणात बिघडलं तर दारूची सवय लागणं शक्य आहे. अशावेळी माणूस कशाचा तरी आधार घेतो. आणि तेच कारणी भूत ठरतं.
सोशल मीडियाचा वापर : या दिवसांमध्ये सोशल मीडियाचा अधिक वापर केला जातो. सर्रास अशावेळी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामचा अधिक वापर करतात.
साफ - सफाईकडे दुर्लक्ष : नाराज असलेली व्यक्ती घराकडे दुर्लक्ष करते. साफसफाईकडे या दिवसांमध्ये दुर्लक्ष केलं जातं.
विलंब : डिप्रेशनमध्ये असलेली व्यक्ती कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. कोणतंही काम वेळेत करत नाही.