Sex संदर्भात स्वप्न...; लैंगिक आरोग्याबाबत इंटरनेटवर विचारले जातात 'हे' प्रश्न!

शारीरिक संबंधाविषयी फायदे किंवा नुकसान जाणून घेण्यासाठी लोकं इंटरनेटवर सर्च करतात. तर आज आपण जाणून घेऊया शारीरिक संबंध आणि आरोग्य यांच्याविषयी लोकं इंटरनेटवर काय सर्च करतात.

Updated: Feb 26, 2023, 06:25 PM IST
Sex संदर्भात स्वप्न...; लैंगिक आरोग्याबाबत इंटरनेटवर विचारले जातात 'हे' प्रश्न! title=

Sexual Health : सेक्स (Sex) संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. खुलेपणाने याबाबत बोललं जात नसल्याने याविषयासंदर्भात माहिती घेण्यासाठी लोकं डि़जीटल प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यासंदर्भातील फायदे किंवा नुकसान जाणून घेण्यासाठी लोकं इंटरनेटवर सर्च करतात. तर आज आपण जाणून घेऊया शारीरिक संबंध आणि आरोग्य यांच्याविषयी लोकं इंटरनेटवर काय सर्च करतात.

शारीरिक संबंधांविषयी (Physical Relation) स्वप्न पडणं सामान्य आहे का?

लोक बर्‍याचदा इंटरनेटवर याबाबत सर्च करतात. या प्रश्नाच्या उत्तरात इंटरनेट म्हणतं- हे सामान्य आहे. जर तुम्हाला शारीरिक संबंधाची तीव्र इच्छा असेल तर ते मिळवण्याची इच्छा आणखीन वाढेल. मानसशास्त्रिय दृष्ट्या, आपलं स्वप्ने केवळ आपल्या इच्छांवर आधारित असतात. म्हणूनच सेक्सबद्दल विचार करणे किंवा स्वप्न पाहणं ही एक अतिशय सामान्यगोष्ट आहे.

Sexually Transmitted Diseases झाल्यावर काय करायचं?

STD म्हणजेच Sexually Transmitted Diseases तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी फार धोकादायक ठरतं. त्यामुळे तुम्हाला जर लैंगिक अवयवांजवळ जळजळ, इरीटेशन, किंवा इन्फेक्शनची (Infection) तक्रार जाणवली तर स्त्रिरोगतज्ज्ञांद्वारे तातडीने याची तपासणी करून घ्यावी.

सेक्स टायमिंग (Sex Timing) कसा वाढवावा?

हा प्रश्न इंटरनेटवर विचारला जाणारा टॉपचा प्रश्न आहे. लोकांद्वारे विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाला इंटरनेट उत्तर देतं की, ज्या व्यक्तींना फास्ट एजाक्यूलेशनची समस्या असते त्यांनी एक सोपी प्रॅक्टिस केली पाहिजे. दरम्यान सेक्सचा टायमिंग वाढवण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणंही फायदेशीर ठरतं.

प्रेग्नेंसी रोखण्यासाठी प्रोटेक्शनवर विश्वास ठेवावा का?

या प्रश्नाच्या उत्तरावर इंटरनेट (Internet) उत्तर देतं की, हे खूप गरजेचं आहे. असे अनेक कॉन्ट्रासेप्टिव प्रोडक्ट्स आहेत जे नको असलेली प्रेग्नेंसी रोखण्यासाठी मदत करतात. लैंगिक संबंधांदरम्यान कंडोमचा (Condom) वापर करणं सुरक्षित मानलं जातं.