मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा वाढचा धोका पाहता पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला. फ्रंटलाईन वर्कर्स आणि जेष्ठ व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही पंतप्रधानांनी घोषणा केली आहे. 60 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती ज्या इतर गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, ते बूस्टर डोस घेऊ शकतात.
को-विन संचालनचे प्रमुख आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे CEO डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितलं की, या डोससाठी वृद्धांना मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता असेल. ज्यांना कोमॉर्बिडीटी आहे अशा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती बूस्टर डोससाठी पात्र आहेत, डोस घेण्यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागेल. बाकी लसीकरणाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार आहे.
डॉ. शर्मा यांनी सांगितलं की, कोविन-अॅपवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना को-मॉर्बिडीटी सर्टिफिकेट मिळू शकतं. त्यानंतरच त्यांना तिसरा डोस मिळेल.
ते पुढे म्हणाले की, सर्टिफिकेटवर रजिस्टर मेडिकल सराव करणाऱ्या डॉक्टरची स्वाक्षरी आवश्यक आहे. हे अॅपवर अपलोड केलं जाऊ शकतं आणि त्याची हार्ड कॉपी देखील लाभार्थी लसीकरण केंद्रात घेऊन जाऊ शकतात.