अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यास '5' मधाचे फेसपॅक फायदेशीर

सौंदर्य खुलवण्यासाठी मध हे अत्यंत फायदेशीर आहे.

Updated: Aug 16, 2018, 12:47 PM IST
अ‍ॅक्नेचा त्रास  कमी करण्यास '5' मधाचे फेसपॅक फायदेशीर  title=

मुंबई : सौंदर्य खुलवण्यासाठी मध हे अत्यंत फायदेशीर आहे. मध आरोग्याला जितके फायदेशीर आहे तितकेच ते सौंदर्य खुलवण्यासाठीही मदत करते. घरगुती उपायांनी सौंदर्य खुलवण्यास प्रयत्न करत असल्यास मधासोबत हे काही पदार्थ मिसळून चेहर्‍यावर त्याचा उपयोग करावा. 

मध आणि हळद - 

हळद आणि मध दोन्हींमध्ये अ‍ॅन्टी सेप्टिक गुणधर्म आहेत. यामुळे चेहर्‍यावरील अ‍ॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते. हळद आणि मधाचा फेसपॅक चेहर्‍यावर लावल्यानंतर 20 मिनिटांनी स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोन वेळेस हा फेसपॅक लावल्याने अ‍ॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

मध आणि ओटमील - 

ओट्स चेहर्‍यावरील डाग कमी करण्यास मदत करतात. अर्धा कप शिजवलेले ओट्स आणि 2 चमचे मध एकत्र करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा.  अर्धा तासानंतर हा फेसपॅक कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. 

मध आणि व्हिनेगर - 

मधासोबत अ‍ॅपल सायडर व्हिनेगर एकत्र मिसळणं फायदेशीर आहे. हे दोन्ही अ‍ॅसिडीक प्रकृतीचे आहेत. यामुळे त्वचेतील pH पातळी जपण्यास मदत होते. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण चेहर्‍यावर लावावे. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. 

मध आणि लिंबू - 

मधामध्ये लिंबाचा रस मिसळणं फायदेशीर आहे. यामधील अ‍ॅन्टि ऑक्सिडंट घटक, व्हिटॅमिन सी घटक अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यास मदत करतात. मध आणि लिंबाच्या रसाचा पॅक चेहर्‍यावर लावल्यानंतर 10मिनिटांनी  चे
हरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा. 

मध आणि नारळाचं तेल - 

नारळाच्या तेलामध्ये मध मिसळा. या मिश्रणामुळे एक्झिमा, सोयरासिससारख्या आजारांचा धोका कमी होतो. यामुळे अ‍ॅक्नेचा त्रास कमी होतो. 15 मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.