मुंबई : दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमचे नातेवाईक किंवा ऑफिसमधील सहकारी मिठाई वाटतात.
पूर्वीच्या फराळाची जागा आता अशा प्रकारच्या बाजारातील विकतच्या मिठायांनी घेतली आहे. मिठाई अधिक आकर्षित करण्यासाठी त्यावर चांदीचा वर्ख लावला जातो. मात्र यामध्ये भेसळ झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
भेसळयुक्त चांदीचा वर्ख आहारात गेल्यास मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास होतो. म्हणूनच घरच्या घरी खाण्यापूर्वी चांदीच्या वर्खावरील भेसळ या टेस्टमधून ओळखा.
१. मिठाई खाण्यापूर्वी त्यावर हात फिरवा. जर हाताच्या बोटाला चांदीच्या वर्खाचा भाग राहिला तर तो भेसळयुक्त समजावा. अस्सल चांदीचा वर्ख हाताला लागत नाही. त्यामध्ये अॅल्युमिनियमची भेसळ केली जाते.
२. मिठाईवरील चांदीचा वर्ख थोडासा जाळा. जर तो काळसर झाला तर तो अॅल्युमिनियमने भेसळयुक्त झाला आहे असे समजावे. अस्सल चांदीच्या वर्खाचा गोळा होईल.
३. तुम्ही मिठाईवर लावण्यासाठी चांदीचा वर्ख आणला असेल तर तो भेसळयुक्त आहे की नाही ? हे आधी तपासा. यासाठी तो दोन्ही तळव्यांच्या मधोमध धरून चोळा. जर तो अस्सल असेल तर तो निघून जातो पण जर अॅल्युमिनियमयुक्त असेल तर त्याचा गोळा होईल.