Health Tips : व्यायाम किंवा योगा केल्याने मन प्रसन्न आणि शरीर निरोगी राहतं असं म्हणतो. दररोज काही वेळ व्यायामाने रक्ताभिसरण सुधारते आणि फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारते. नियमित योगा, व्यायामाने आजारपण, मधुमेह, लठ्ठपणा, नैराश्य आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. व्यायामाचे हे सर्व फायदे आपल्याला माहितच आहेत. मात्र, खरंच आपण दररोज व्यायाम करतो का? तर उत्तर नाहीच असं मिळेल. मात्र, जर तुम्हाला कोणी सांगितलं की असा व्यायामाचे प्रकार आहे ज्याने तुमची सेक्स लाईफ सुधारते. तर मग ते तुमचं नियमित व्यायाम करण्याचं मोटिवेशन ठरू शकतं. तुमच्यापैंकी अनेकांनी सेर्क्ससाईझ हा शब्द ऐकलं असेल, त्याविषयी थोडं जाणून घेऊया.
सेर्क्ससाईझ म्हणजे व्यायामाचे असे प्रकार ज्यामुळे तुमचे लैंगिक जीवन सुधारण्यास मदत होते. याप्रकारामुळे तुमची क्षमता, ताकद, लवचिकता आणि पेल्विक मसल्सच्या बळकटीकरणाकडे भर दिला जातो. विशेषत: लैंगिक अॅक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हे व्यायाम प्रकार केले जातात. या प्रकारामुळे सेक्सचा आनंद जास्त काळ घेता येतो. सोबतच सेक्स अधिक आनंददायी होतो.
आवडत्या व्यक्तीसोबत सेक्स केल्याने तुम्हाला खूप छान वाटू लागतं. याने तुमच्या शरीरातील गुड हार्मोन्स ऍक्टिव्ह होतात. जोडीदाराशी भावनिकरित्या जोडलं गेल्यामुळे त्वचेपासून त्वचेच्या संपर्कामुळे एंडोर्फिन ग्रंथी स्त्रवल्यामुळेच तुम्हाला जास्त आनंद मिळतो.
कॅलरी बर्न करण्यासाठी सेक्स हा एक उत्तम मार्ग असू शकतो असं तज्ज्ञ सांगतात. सामान्यतः सेक्स दरम्यान एका मिनिटाला सुमारे तीन किंवा चार कॅलरीज बर्न होतात. हे प्रमाण म्हणजे चालताना किंवा सायकल चालवताना जळणाऱ्या कॅलरीज एवढं आहे.
यासारख्या व्यायाम प्रकारामुळे तुमचं सेक्स लाईफ सुधारू शकते. तुम्ही तुमचे लैंगिक जीवन सुधारण्यासाठी तंदुरुस्त होत आहात किंवा तंदुरुस्त होण्यासाठी सेक्स करत आहात ही एकच बाब आहे.
( नोंद - वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं )