Hair Care Tips: डोक्यावरील केस सौंदर्यात भर घालतात. चेहऱ्याला आकर्षक वाटेल अशी हेअर स्टाईल दररोज केली जाते. यामुळे केसाचं महत्त्व अधोरेखित होतं. सुंदर दिसण्यासाठी केस निरोगी असणे खूप गरजेचे आहे. मात्र गेल्या वर्षात आहार, प्रदूषण आणि इतर कारणांमुळे केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा कमी वयात केस गळतीचं प्रमाण वाढत असल्याने नैराश्य येतं. यामुळे केसांची निगा राखणे खूप गरजेचं आहे. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि ते मजबूत आणि चमकदार राहण्यासाठी वेळोवेळी तेल लावले पाहिजे. काही जण केसांना तेल लावत नाहीत. केसांना तेल लावल्याने केसांना फायदा तर होतोच पण त्यामुळे तुमच्या टाळूही सुरक्षित राहते. म्हणूनच केसांना तेल लावणे खूप गरजेचे आहे. केसांना तेल न लावण्याचे काय तोटे आहेत? जाणून घ्या
केसांना तेल न लावण्याचे नुकसान
1- केसांना तेल न लावल्याने तुमचे केस कोरडे होऊ शकतात आणि त्यामुळे केस कमकुवत होतात.
2- उन्हाळ्यात केस आणि टाळूमध्ये आर्द्रता किंवा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक आहे.
3- टाळूतील मुरुम आणि खाज टाळण्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक आहे.
4- केसांना तेल न लावल्याने कोरडेपणा आणि कोंडा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
5- तेल न लावल्याने केसांना पोषण मिळत नाही आणि केस तुटू लागतात.
केसांना तेल लावणं महत्वाचं आहे?
1- केसांचे पुरेसे पोषण, वाढ आणि मजबुती यासाठी वेळोवेळी तेल लावणे आवश्यक आहे.
2- केस मजबूत आणि निरोगी होण्यासाठी तेल लावणे आवश्यक आहे.
3- केसांचा फ्रिजिनेस कमी करण्यासाठी आणि तुटू नये यासाठी तेल लावणे आवश्यक आहे.
4- केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक आहे.
5-केसांचे पोषण होण्यास मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे उपाय करण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)