मेघा कुचिक : कर्करोगासारखा (Cancer) आजार ऐकूणच अनेकांना धक्काच बसतो. या आजारानंतर रुग्ण आणि नातेवाईकांसमोर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे उपचाराचा आणि खर्चाचा. भारतातील कर्करोगाच्या (cancer) 66 टक्के रुग्णांचे उपचार खासगी रुग्णालयात होतात. तेथे कर्करोगाच्या चाचण्यांपासून शस्रक्रिया आणि उपचारासाठी किमान सहा ते सात लाखापर्यंतचा सरासरी खर्च होतो. त्यातच भारतीय (Indian People) नागरिकांचे सरासरी कौटुंबिक उत्पन्न हे वार्षिक एक लाख 26 हजार रुपये आहे. त्यावरून असा निष्कर्ष काढता येईल की एका कुटुंबाला किमान पाच वर्षांचे उत्पन्न कर्करोगावरील उपचारासाठी खर्च करावे लागते. (good news Radiation therapy for cancer treatment available in Sion hospital mumbai news marathi)
याच पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या टाटा (Mumbai Tata Hospital) वगळता कर्करोगावर रेडिएशन (Radiation on cancer) ही उपचार पद्धती कमी खर्चात केले जाणारे एकही सरकारी रुग्णालय नाही. आता आगामी दोन ते तीन वर्षात ही कर्करोगावरील रेडिएशन ही उपचार पद्धत कमी खर्चात सायन रुग्णालयात (Sion Hospital) सुरू केली जाणार आहे. याबाबत सायन रुग्णालयाचे डीन. डॉ. मोहन जोशी (Dean. Dr. Mohan Joshi) यांनी झी 24 तास ला प्रतिक्रिया देताना सांगितले की, कर्करोगावरील इतर जवळपास सर्व उपचार सायन रुग्णालयात होतात. 800-1000 रुग्णांना आठवड्यात किमोथेरपी (Chemotherapy) करतो. मात्र रेडिएशन उपचार पद्धत अजून होत नाही. खाजगी रुग्णालयात (private hospital) रेडिएशन उपचार पद्धत खर्चिक आहे.
वाचा : 'या' शहरातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी!
रेडिएशन उपचार पद्धतीसाठी बंकर इमारत बांधावी लागते. या बांधकामासाठी आगामी 8-10 दिवसात निविदा काढल्या जातील, 12 मजल्याची इमारत असेल, कर्करोगावर सर्व उपचार सायन रुग्णालयात उपलब्ध होतील. डीन झाल्यापासून रेडिएशन उपचार पद्धतीसाठी प्रयत्न सुरू केले. कर्करोगावरील रेडिएशन उपचार पद्धत 2-3 वर्षांत सायन रुग्णालयात सुरू होईल. एका दिवसात किमान 50-80 रुग्णांना रेडिएशन उपचार देणे शक्य होईल.
कडक नियम आहेत. रेडिएशन उपचार करण्यासाठी ठराविक बांधकाम होणे आवश्यक आहे. करण इतर रुग्णांना रेडिएशनमुळे इजा होऊ नये. आता नवं बांधकाम आणि नियम पाळण्याची क्षमता आली आहे. यामुळे आता रेडिएशन उपचार करणे इतक्या वर्षांनी सरकारी रुग्णालयात शक्य होणार आहे. उपचार खर्चाबाबात आताच बोलणं संयुक्तिक नाही, मात्र पंतप्रधान योजना आणि महात्मा फुले योजना राबवतो आणि पिवळा, ऑरेंज रेशनकार्ड असलेल्या रुग्णांना नगण्य खर्चात उपचार करण्यात येईल. 75 ते 100 विविध डॉक्टर्स नेमले जातील. अडचण ही जागेची होती, मात्र याच कॅम्पस मध्ये आता जागा मिळाली आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाचे डीन. डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.