Water Chestnuts Health Benefits : सध्या पाऊस, थंडी आणि उन्हाचा लपंडाव सुरु आहे. पावसाळ्यानंतर चाहुल लागते ती हिवाळ्याची. हिवाळा ऋतू हा सगळ्यांचा हवा हवासा वाटतो. या दिवसांमध्ये बाजारात ताजा भाजीपाला आणि फळं मिळतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात एक असं फळं आहे जे खास हिवाळ्यातील दोन महिने मिळतं. या फळाची दिवाळीत खास पूजाही केली जाते. आम्ही बोलत आहोत, शिंगाडे म्हणजे वॉटर चेस्टनटबद्दल. (gas acidity and constipation from weight loss health benefits of eating water chestnuts or singhada in marathi)
पाण्यामध्ये उगवणारं हे फळं कुरकुरीत आणि चवीला अतिशय गोड असतं. कमी किंमती मिळणाऱ्या या फळाचे आपल्या आरोग्यास अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेवर हे फळ रामबाण उपाय आहे.
शिंगाडे किंवा वॉटर चेस्टनटमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि न्यूट्रिशन अर्थात पोषकतत्वांचे प्रमाण भरपूर आढळतं. यासबतच शिंगाडे हे फायरबरचा उत्तम स्त्रोत आहे. संशोधनानुसार फायबरयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करण्यात मदत मिळते.
हृदयविकारामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू होतात. उच्च रक्तदाब (high blood pressure), रक्तातील उच्च कोलेस्ट्रॉल (एलडीएल कोलेस्ट्रॉल) (high blood cholesterol) स्ट्रोक आणि उच्च रक्त ट्रायग्लिसराइड्स (strokes and high blood triglycerides) यांसारख्या जोखमींमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
शिंगाड्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. 2013 च्या रिव्हीव्यूनुसार आपल्या शरिरात पोटॅशिअमचे प्रमाण वाढल्याने उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्यांना आराम मिळतो. त्यामुळे शिंगाडे खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
अनेक संशोधनांच्या एका रिव्हीव्यूमध्ये आढळून आलंय की, उच्च पोटॅशिअमचे सेवन केल्याने स्ट्रोक आणि हृदयरोग दोन्हींच्या जोखमी किंवा समस्या कमी आढळून आल्या होत्या. अर्ध्या कापलेल्या शिंगाड्यामध्ये 362 मिलीग्रॅम पोटॅशिअम आढळते.
शिंगाडे किंवा वॉटर चेस्टनटमध्ये 74 टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे शिंगाड्याला उच्च-आहाराच्या फळांच्या कॅटेगरीमध्ये ठेवले जाते. हाय-वॉल्यूम असणाऱ्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज नसतात. (4)
कॅलरीजचे प्रमाण कमी असूनही हाय-वॉल्यूम फळे किंवा खाद्यपदार्थ आपली भूक कंट्रोल करण्यात मदत करतात. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही या फळाचे सेवन अवश्य करु शकता. या फळामुळे आपले पोट लवकर भरते, त्यामुळे पोट भरण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
शिंगाड्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने, ते आपल्या शरिराला हानिकारक अणूंच्या विरोधात फ्री-रॅडिकल्सपासून बचाव करण्यात मदत करते. जर हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरिरामध्ये जमा झाले तर ते आपल्या शरिराचे नैसर्गिक संरक्षणाला (natural defenses) कमी करू शकतात आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाला (oxidative stress) उत्तेजन किंवा प्रोत्साहन देऊ शकतात.
शिंगाडे किंवा वॉटर चेस्टनटमध्ये अँटिऑक्सिडंन्ट फेरुलिक अॅसिड (Antioxidant Ferulic Acid) प्रमाण अधिक आढळून येते. अभ्यासानुसार हे अॅसिड कॅन्सरच्या जोखमीला किंवा कॅन्सरला कमी करु शकते. एका टेस्ट-ट्यूब अभ्यासामध्ये (test-tube studies) शास्त्रज्ञांना आढळून आले की स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींवर फेरुलिक अॅसिडने उपचार केल्याने त्या पेशींची वाढ कमी होण्यास मदत झाली होती.
त्याशिवाय जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर चेस्टनटचे पाणी तुम्हाला ही समस्या दूर करण्यात खूप मदत करू शकते. चेस्टनटमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात आणि ते घशाच्या अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करते. घसा खवखवणे आणि टॉन्सिल्सपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही चेस्टनटचे पाणी घेऊ शकता. पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी चेस्टनटचे पाणी सेवन करणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. चेस्टनटचे पाणी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेही रुग्णही याचे सेवन सहज करू शकतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)