मुंबई : मनुके हेल्दी आणि टेस्टी. रोज खाल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. यात ऊर्जा भरपूर प्रमाणात असते. रोज एक ७-८ मनुके खाणे फायदेशीर ठरते. जाणून घेऊया मनुके खाण्याचे फायदे...
रक्तदाबाची समस्या असल्यास रात्री अर्धा ग्लास पाण्यात ८-१० मनुके भिजवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते पाणी प्या. इच्छा असल्यास भिजवलेले मनुकेही तुम्ही खावू शकता. यामुळे रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच फायदा होईल.
ऑफिसमध्ये थकल्यासारखे वाटत असल्यास मध्ये मध्ये मनुके खात रहा. मनुके ऊर्जेचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. यात कार्बोहाइड्रेड आणि फायबर्स असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
मनुके खाल्याने शरीरात असलेली रक्ताची कमी दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन वाढण्यासही मदत होते.
जर तुम्हाला खूप काळापासून खोकला असल्यास मनुके खाणे लाभदायी ठरेल. दमा असलेल्यांना आणि टीबी रोगाने ग्रस्त असलेल्यांसाठीही मनुके खाणे फायदेशीर ठरेल.
बदलत्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे. मनुके खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. मनुकांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही राखले जाते. त्याचबरोबर दृष्टी सुधारण्यास उपयुक्त ठरतात.