Home Remedies For Period Cramps: मुलींमध्ये वाढत्या वयात शारीरिक बदल होत असतात. त्यातलाच महत्त्वाचा बदल म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीत अनेक मुलींना आणि महिलांना वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागते. काहींना त्या काळात त्रास कमी होतो तर काहींचा त्रास हा अधिक असतो. पण मासिक पाळीत त्रास होणे हे सामान्य आहे. काही केसेस मध्ये औषधं घेऊनही लोकांचा त्रास कमी होत नाही पण काही केसेस मध्ये लोकं घरगुती उपाय करुनही या समस्येपासून स्वत:ची सुटका करुन घेतात.
अनेकदा सतत औषधे घेतल्याने आपल्याला साईड इफेक्टस् देखील होऊ शकतात. म्हणून महिला त्या काळात होणारा त्रास सहन करतात पण डॉक्टरकडे जाण्याचा विचार नाही करत. पण आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत त्या काळात तुम्ही त्याचा वापर करुन स्वत:ची काळजी घेऊ शकाल. (Do you get menstrual cramps Doing this home remedy will get relief nz)
मासिक पाळी आल्यावर साधारणत: ओटीपोट जास्त दुखते मग अशावेळेस गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट व कंबर शेकवा आणि हे शक्य नसेल तर गरम गरम पाण्याने दिवसातून दोन वेळा अंघोळ करा.
मासिक पाळीच्या दुखण्यामध्ये अजवाईन पाणी घेतल्यास त्याचा खूप फायदा होतो. दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही ते आरामात पिऊ शकता. ते बनवण्यासाठी दोन कप पाणी उकळायला द्या आणि त्यात एक चमचा अजवाईन घाला. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. आता ते गाळून त्यात चिमूटभर काळे मीठ टाकून गरम पाण्याचे घोट प्या. काही वेळात तुमचा त्रास दूर होईल.
एक ग्लासभर दुधात १ चमचा हळद मिसळुन घेतल्यास लाभ होतो. पाण्यात हळद, तेजपान, तुळशीची पाने व गुळ टाकुन त्यांचा काढा घेतल्यास मासिक पाळीतील वेदना कमी होतात. हळद गुणकारी असते त्यामुळे पोटदुखीवरही आराम मिळतो. यामुळे मासिक पाळीच्या क्रॅम्पपासूनही आराम मिळू शकतो.
धने किंवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. अशा विविध पद्धतीने शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)