जोरात नाक साफ करत असाल, तर सावधान, याचा परिणाम ठरू शकतो धोकादायक

हिवाळ्यात सर्दी होणे ही सामान्य सवय असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की चुकीच्या पद्धतीने नाक साफ केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात? अनेकजण नाक शिंकरतांना जास्त दाब लावतात, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक भागांवर परिणाम होतो आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात.  

Intern | Updated: Dec 11, 2024, 05:41 PM IST
जोरात नाक साफ करत असाल, तर सावधान, याचा परिणाम ठरू शकतो धोकादायक title=

जास्त दाबाने नाक शिंकरल्याने केवळ शिराच फुटू शकत नाहीत, तर नाकाच्या ऊतींना दुखापत होण्याची शक्यताही वाढते. ज्यामुळे नाकातून रक्तस्त्राव आणि सूज येण्यासारखे नुकसान होऊ शकते. इतकेच नाही तर नाकाच्या आत जास्त दाब दिल्यास श्लेष्मा सायनसकडे जाऊ शकतो, ज्यामुळे संसर्ग आणखी वाढतो. या सवयीमुळे चक्कर येणे, नाक फुटणे आणि नाकाच्या बाहेरील भागात वेदनाही होऊ शकतात.

नाक जोरदार शिंकरल्याचे तोटे:  
1. नाकातून रक्तस्त्राव: जबरदस्तीने नाक शिंकरल्यामुळे नाकातील नाजूक रक्तवाहिन्या तुटून रक्तस्त्राव होऊ शकतो.  
2. कानाच्या पडद्याला इजा: जास्त दाब दिल्यास दाब कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचून नुकसान होऊ शकते.  
3. सायनस संसर्ग: जोरदार शिंकरल्याने श्लेष्मा सायनसमध्ये जाऊ शकतो, ज्यामुळे संसर्ग वाढतो.  
4. नाकाचा संसर्ग (व्हेस्टिब्युलायटिस): नाकाच्या आतील भागाला लहान कट्स येऊ शकतात, ज्यामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.  
5.ऑर्बिटल फ्रॅक्चर: गंभीर प्रकरणांमध्ये, जोरदार नाक शिंकरल्यामुळे डोळ्यांजवळची हाडे मोडण्याचा धोका असतो.  

नाक साफ करण्याची योग्य पद्धत:
1. नाक शिंकरतांना हलका दाब द्या. एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीतून हळूवारपणे बाहेर काढा.  
2. दाबून किंवा जोरदार ओढून नाका स्वच्छ करण्याचे टाळा.  
3. वाफ घेण्याचा पर्याय निवडा. वाफ श्लेष्मा सैल करण्यास आणि नाक साफ होण्यास मदत करते.  
4. वारंवार नाक शिंकरायची सवय टाळा, कारण त्यामुळे नाकाच्या आतील भागाला नुकसान होऊ शकते.  
 
नाक साफ करताना योग्य पद्धतीचा अवलंब केल्याने हिवाळ्यात सर्दीच्या समस्यांवर सोपी उपाययोजना करता येऊ शकते. नाक जोरात शिंकरणे टाळा आणि वाफ घेण्यासारख्या सुरक्षित पर्यायांचा उपयोग करा.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)