मुंबई : पावसाळ्याची मज्जा चहासोबत भजी किंवा गरमागरम वडे खाण्यात असते. मात्र आहाराचं पथ्यपाणी बिघडणं काहींसाठी त्रासदायक ठरू शकते. अशांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाबाचे रूग्ण. उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांमध्ये आहाराचं गणित सांभाळणं गरजेचे आहे. अन्यथा जीभेचे चोचले पुरवताना आरोग्य मात्र धोक्यात येते.
उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी आहारात शक्यतो कमी मीठ खावे. छुप्या पद्धतीने मीठ आहारात जाईल असे पदार्थ म्हणजे लोणचं, पापड किंवा इतर प्रिझर्व्हव्हेटीवयुक्त पदार्थही कमी खावेत.
आहारात ऋतूमानानुसार मिळणार्या ताज्या हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करणं आवश्यक आहे. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
पावसाळा सुरू झाला की तळकट, चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह अधिक असतो. मात्र रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी अशाप्रकारचा आहार टाळावा.
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी मिठाईदेखील त्रासदायक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही कोलेस्ट्रेरॉलरहीत दूध पिणेही आरोग्याला फायदेशीर आहे.
बदाम, अक्रोड यांचा आहारात समावेश करणं त्रासदायक ठरू शकतं. नियमित किमान 5 बदाम आणि अक्रोड खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामधील ओमेगा 3 अॅसिड उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांना फायदेशीर ठरते. औषधाविना रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे '5' उपाय