मुंबई : कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. यानंतर राज्यात डेल्टा प्लसच्या रूग्णांचीही नोंद केली गेली. यामध्ये डेल्टा प्सलमुळे 5 जणांचा बळीही गेल्याची माहिती आहे. तर आता राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचेच अजून 3 उपप्रकार असल्याचं म्हटलं जातं. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा प्लस प्रकाराचे हे नवीन रूप किती धोकादायक आहे आणि त्याच्या संसर्गाच्या दराबद्दल अधिक अभ्यास आवश्यक आहे.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 66 रूग्ण आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंट ग्रुपचे Ay.1, Ay.2 आणि Ay.3 तीन वेगवेगळे प्रकार आहेत. आता, शास्त्रज्ञांनी डेल्टा-प्लसच्या आणखी 13 उप-प्रकारांचा शोध लावला आहे, जे Ay.1, Ay.2, Ay.3 पासून सुरू होतात आणि 13 ने समाप्त होतात. डेल्टा-व्हेरियंटमध्ये म्युटेशन झाल्यानंतर डेल्टा-प्लस तयार होतो. हे डेल्टाच्या स्पाइक प्रोटीनमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळे होते. यामुळे संक्रमित पेशींना विषाणूची जोड वाढते.
आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटची 11 प्रकरणे मुंबईत सापडली आहेत. महानगरातील पूर्व भागात 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, 69 वर्षीय महिलेचाही कोरोनाच्या या प्रकारामुळे मृत्यू झाला. याशिवाय रत्नागिरीमध्ये एका 80 वर्षीय महिलेलाही आपला जीव गमवावा लागला.
राज्यात 66 डेल्टा प्ससच्या रूग्णांची नोंद
आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लसने संक्रमित झालेले 66 रुग्ण सापडले आहेत. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या 66 रुग्णांपैकी काहींनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. ही प्रकरणं राज्याच्या विविध भागातून घेतलेल्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीत आली. डेल्टा प्लस व्हेरिएंटची जास्तीत जास्त 13 प्रकरणं उत्तर महाराष्ट्रातील जळगावातील आहेत. त्याचवेळी, 12 प्रकरणे रत्नागिरीतून आणि 11 मुंबईतील आहे.