Covishield vaccine च्या साईड इफेक्ट्सच्या बातम्या समोर येत आहोत. अनेकांना यामुळे हृदयविकाराचे झटके आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच काळजी म्हणून अनेकांनी रक्त पातळ करणारी औषधे विनाकारण घेणे सुरू केले आहे. या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लक्षात ठेवा रक्त पातळ करणारे औषध जास्त प्रमाणात वापरल्याने अनेक नुकसान होऊ शकतात.
कोरोना विषाणूची लस Covishield सध्या खूप वादात आहे. AstraZeneca औषधी कंपनीची ही लस कोरोनाच्या काळात भारतातही वापरली गेली. या लसीचे काही गंभीर दुष्परिणाम आता दिसू लागल्याचे वृत्त आहे.
या बातमीनंतर, लसीकरण झालेल्या अनेकांना प्लेटलेटची संख्या कमी होण्याची किंवा रक्ताची गुठळी तयार होण्याची भीती वाटते. यामुळेच काही लोकांनी रक्त पातळ करणारे औषध घेणे सुरू केले आहे. अशी प्रकरणे फारच दुर्मिळ असल्याचा कंपनीचा दावा खरा असेल, तर साहजिकच घाईघाईत ब्लड थिनर्स घेतल्यास तुम्हाला अनेक गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
Covishield बद्दल, असा दावा केला जात आहे की, त्याचे एक गंभीर दुष्परिणाम म्हणजे ते प्लेटलेटची संख्या कमी करत आहे आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत आहेत. यामुळे लोकांना हृदय विकाराचा झटका येत आहे. कंपनीने थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) हे लसीच्या दुष्परिणामांपैकी एक म्हणून मान्य केले आहे. ही एक वैद्यकीय स्थिती आ,हे ज्यामध्ये प्लेटलेट्सची संख्या असामान्यपणे कमी होऊ शकते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. कंपनीने असेही म्हटले आहे की, अशी प्रकरणे फारच कमी आहेत.
या बातमीनंतर, लसीकरण झालेल्या अनेकांना प्लेटलेटची संख्या कमी होण्याची किंवा रक्ताची गुठळी तयार होण्याची भीती वाटते. यामुळेच काही लोकांनी रक्त पातळ करणारे औषध घेणे सुरू केले आहे. अशी प्रकरणे फारच दुर्मिळ असल्याचा कंपनीचा दावा खरा असेल, तर साहजिकच घाईघाईत ब्लड थिनर्स घेतल्यास तुम्हाला अनेक गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ब्लड थिनर म्हणजे, रक्त पातळ करणारी औषधे आहेत जी रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करतात. त्यांच्या सेवनाने आधीच अस्तित्वात असलेल्या गुठळ्या तुटत नाहीत परंतु त्या गुठळ्या मोठ्या होण्यापासून रोखू शकतात. रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे शिरा, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो.
MedlinePlus च्या मते, जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे अनावश्यकपणे किंवा जास्त प्रमाणात घेत असाल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. याचे सेवन केल्याने पोटदुखी, मळमळ आणि जुलाब होऊ शकतात. या व्यतिरिक्त, खालील दुष्परिणाम देखील होऊ शकतात-