मुंबई : काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका, पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत 8 दिवस अंघोळ केली, तर तुम्हाला आयुष्यात चर्मरोग होणार नाही.
अनेक वेळा शरीरावर लहानसहान बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्वचेला खाज सुटण्यासारखे प्रकार होतात, ते देखील बंद होतील.
तुरटी जी सहज किराणा दुकानावर उपलब्ध होते, 10 रूपयाला 50 किंवा 100 ग्रॅम असा तुरटीचा भाव आहे. एका प्लास्टीकच्या बाटलीत तुरटीचे लहान-लहान तुकडे करून टाका, पाणी टाका. यानंतर तुरटीचे द्रावण तयार होईल.
हे द्रावण अंगाला अशा ठिकाणी लावा, ज्या ठिकाणी घाम जमा होणे, अथवा खाज सुटण्याची शक्यता अधिक असते, जसे डोके, खाकेत आणि मांड्यांच्या मध्ये. खाकेत तुरटीचे द्रावण लावल्याने दुर्गंधी जाण्यासही मदत होते.
तुरटीचे हे द्रावण लावल्यानंतर पाच मिनिटात सुकते, सुकल्यानंतर पांढरे स्फटीक स्पष्ट दिसतात, यानंतर अंघोळ करा, अशी आंघोळ सतत 8 दिवस आणि वर्षभरात 4 वेळा केल्यास, तुम्हाला कजकर्ण, नायटा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. शिवाय शरीराची दुर्गंधी येणार नाही, केसांत चाई देखील होणार नाही.
आंघोळ करताना तुरटीचे पाणी डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, हे पाणी डोळ्यात गेल्यास अधिक जळजळ होते. यासाठी डोके धुतांना डोळे घट्ट मिटा.