Zee5: प्रदर्शनापूर्वीच 'स्कायफायर' वेबसीरिजची इंटरनेटवर धूम

'सायफाय' प्रकाराची ही वेबसीरिज आहे.

Updated: May 15, 2019, 11:45 AM IST
Zee5: प्रदर्शनापूर्वीच 'स्कायफायर' वेबसीरिजची इंटरनेटवर धूम title=

मुंबई : झी ५ ओरिजिनलने आता भारतातल्या आपल्या प्रेक्षकांसाठी पहिली वेबसीरिज आणली आहे. 'स्कायफायर' असं या वेबसीरिजचं नाव आहे. 'सायफाय' प्रकाराची ही वेबसीरिज आहे. भारतात ही अशाप्रकारची पहिलीच वेबसीरिज आहे. या मालिकेसाठी झी ५ ने अरूण रमण यांच्या स्कायफायर या पुस्तकाचे अधिकार खरेदी केले आहेत. या मालिकेचं चित्रीकरण मुंबई, दिल्ली, डेहराडून, केरळ आणि भूतानमध्ये करण्यात आलं आहे. प्रतीक बब्बर आणि सोनल चौहान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. तसंच बंगाली अभिनेता जिशू सेनगुप्ता आणि जतीन गोस्वामी हेही या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

वेबसीरिजमध्ये सोनलने इतिहासकाराची, मीनाक्षी पीरजादाची भूमिका साकारली आहे. सोनलने स्क्रिप्ट वाचल्यानंतर यावरील पुस्तक वाचलं. त्यामुळे सोनलला गोष्ट आणि पात्र अतिशय चांगल्याप्रकारे समजण्यास मदत झाल्यांच तिने म्हटलंय. प्रतिक बब्बर पत्रकार चंद्रशेखर ही भूमिका साकारत आहे. अनेक रिसर्च आणि मेहनतीनंतर या भूमिकेसाठी स्वत:ला तयार केल्याचं प्रतिकने म्हटलंय. 

हवामान अंदाजाचा कशाप्रकारे चुकीचा वापर केला जातो याचं चित्रण या वेबसीरिजमधून दाखवण्यात आलं आहे. सायफाय विषयावर आधारित 'स्कायफायर'चा पहिला भाग येत्या २२ मे रोजी झी ५ वर प्रदर्शित करण्यात येणार आहे.