मुंबई : झगमगत्या जीवनाबद्दल सर्वात मोठं आणि कटू सत्य म्हणजे कास्टिंग काऊच. करियरच्या प्रवासात कास्टिंग काऊचबद्दल आलेले वाईट अनुभव प्रत्येक अभिनेत्री आता उघडपणे सांगते. असाचं अनुभव टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चेंटने एका मुलाखतीत सांगितलं आहे. किश्वरला एका मोठ्या स्टार आणि निर्मात्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण त्यांच्या अटीपुढे किश्वरने काम करण्यास नकार दिला. यावेळी तिने आलेल्या वाईट प्रसंगांचा कशा प्रकारे सामना केला.
मी माझ्या करियरमध्ये आनंदी आहे, अशी म्हणणारी किश्वर कास्टिंग काऊचबद्दल सांगते, 'मी एका मिटिंगसाठी गेली होती. तेव्हा माझ्यासोबत माझी आई होती. तेव्हा मला सांगण्यात आलं की तुला अभिनेत्यासोबत रात्र घालवावी लागेल. त्याचं क्षणी मी ती ऑफर नाकारली. मी असं म्हणत नाही, की ही नॉमल गोष्ट आहे.'
पुढे किश्वर म्हणाली, 'प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असे प्रकार घडतात. आता या क्षणी मी त्या स्टार आणि निर्मात्याचं नाव घेणार नाही, पण ते फार मोठे आहेत.' असं म्हणतं किश्वरने कास्टिर काऊचबद्दल आलेला अनुभव सर्वांनसोबत शेअर केला. कास्टिंग काऊचचा अनुभव आल्यानंतर किश्वरने अभिनयाचा प्रावास थांबवला नाही.
ती म्हणाली, 'माझं फोकस माझ्या कामावर होतं. मी माझा मोर्चा टीव्ही विश्वाकडे वळवला. त्यानंतर मला चांगल्या कामांसाठी ऑफर येणं सुरू झालं. आज मी माझ्या करियरमध्ये अत्यंत आनंदी आहे.' मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी किश्वरने 'भेजा फ्राय 2' आणि 'हम तुम और शबाना' या चित्रपटांमध्ये काम केलं.