Farah Khan Salman Khan : लोकप्रिय कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खाननं या चित्रपटसृष्टीमध्ये एक कोरिओग्राफर म्हणून 90 च्या दशकात पदार्पण केलं. फराह खाननं असे अनेक लोकप्रिय गाणी कोरिओग्राफ केली आहेत जी आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेची आहेत. पण जेव्हा फराह खाननं शिल्पा शेट्टीसोबत सुपर डान्सर या शोमध्ये दिसली. त्यावेळी तिनं अनेक गोष्टींचे खुलासे केले.
फराहन सेलिब्रिटींना डान्स शिकवण्यावर सांगितलं की "जॅकी श्रॉफला डान्स शिकवणं सगळ्यात कठीण आहे. मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये नवीन होते तेव्हा मी एक चित्रपट करत होते, तो करण्याआधीच माझं करिअर हे संपणार होतं. त्याचं कारण म्हणजे मला एक गाणं मिळालं होतं ज्यासाठी मला जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि पूजा भट्टला डान्स शिकवायचा होता. तो म्हणायचा, हे बघ भीडू, एक तर मी लिप्सिंग करू शकतो किंवा स्टेप, दोन्ही एकत्र होऊ शकत नाही."
पुढे फराह खान म्हणाली की, "पहिली स्क्रिन टेस्ट जेव्हा होती तेव्हा सलमान खान. मला सलमान खानला डान्स शिकवायचा होता. पण 4 तासात मी पळून गेले आणि खूप रडले की तुला कोणी डान्स शिकवू शकत नाही. तुला डान्सबद्दल काहीच माहित नाही. मैने प्यार किया या चित्रपटासाठी निर्मात्यांनी त्याची निवड केली हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला मोठा धक्का बसला आणि जेव्हा मी चित्रपट पाहिला. तेव्हा मला त्याहून मोठा धक्का बसला कारण त्यानं खूप चांगलं काम केलं होतं."
दरम्यान, फराह खान आणि शाहरुख खान हे बेस्ट फ्रेंड्स आहेत. ते दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आनंद होतो. एका मुलाखतीत फराह तिच्या आणि शाहरुख खानच्या बॉन्डबद्दल बोलताना दिसली.
हेही वाचा : 'पती आणि माझ्या वयातील फरकामुळे...', Kaanta Laga फेम अभिनेत्रीचं आई न होण्यावर मोठं वक्तव्य
फराह पुढे म्हणाली, 'जेव्हा ओम शांती ओमचं शूटिंग सुरु होतं तेव्हा फराह प्रेग्नंट होती. याच चित्रपटातून दीपिकानं देखील पदार्पण केलं. पुरुषाच्या तुलनेत स्त्री एकावेळी अनेक काम करू शकते. आम्ही कोणतीही तक्रार न करता एकावेळी 7 गोष्टी करु शकतो. आम्ही ते अगदी सहजपणे करतो आणि त्याबद्दल गाजावाजा करत नाही. मी गर्भवती होते, मला तिळी मुलं होणार होती. त्याआधी मला माझ्या शेवटच्या चित्रपटाचं शेड्यूल्ड पूर्ण करायचं होत. यात शाहरुख खूप चिडला होता कारण त्याच वेळी आम्ही दर्दे डिस्को या गाण्याचं शूटिंग पूर्ण करत होतो. त्यात जेव्हा केव्हा तो शर्ट काढायचा तेव्हा मी देखील नाचू लागायची.'