मुंबई : 'लागिरं झालं जी' या मालिकेची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे. आणि आता या चर्चेच कारण आहे मालिकेतील दोन खलनायिकांची एक्झिट. लागिरं झालं जी या मालिकेत जयडी आणि मामी या दोन पात्रांनी अचानक मालिका सोडली आहे. गेल्या एका वर्षापासून किरण धाने जयडी आणि विद्या साळवे मामी, फेडरेशन अध्यक्ष पुष्पा भोईते यांची भूमिका साकारत होत्या. पण अचानक या दोघींनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी 21 जून रोजी सादर झालेल्या एपिसोडमध्ये जयडी आणि मामीची भूमिका करताना दुसऱ्या दोन कलाकार दिसल्या. यामुळे प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसल्या. मामी आणि जयडी या लागिरं झालं जी या मालिकेतील लोकप्रिय खलनायिका आहेत. असं असताना त्यांनी ही मालिका का सोडली हा प्रश्न साऱ्यांनाच आहे. हे पण वाचा - ... यासाठी जयडी आणि मामीने सोडली 'लागिरं झालं जी' मालिका?
गेल्या एक वर्षापासून किरण धाने ही जयडीची भूमिका साकारत होती. पण आता तिच्या जागी पुण्यातील पूर्वा शिंदे आली असून आता पूर्वा जयडीची भूमिका साकारणार आहे. पूर्वा शिंदे ही पुण्याला राहणारी असून आयब्रो गर्ल म्हणून सोशल मीडियावर तर लोकप्रिय आहे. अभिनेत्री प्रिया प्रकाशनचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यापाठोपाठ पुण्यातील पूर्वा शिंदे हिचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता. पूर्वाच्या या व्हिडिओला एका रात्रीत 60 हजार लोकांनी पाहिला असून 9 हजार लोकांनी या व्हिडिओला पसंत केलं आहे.
पूर्वा शिंदे पुण्यात राहत असून तिने हॉस्टेल गर्ल या सिनेमांत देखील काम केलं आहे. तसेच पूर्वा शिंदे यासाठी देखील सिनेमांत काम केलेलं आहे. पूर्वा शिंदे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरील तिचा बोल्ड अंदाज सध्या भरपूर पसंतीला आहे. तिच्या चाहत्यांनी जयडीच्या साडीच्या रुपात तिलं पाहिलं तर धक्का बसलाच.
त्याचप्रमाणे या मालिकेतील दुसरी खलनायिका म्हणजे मामी, फेडरेशन अध्यक्षा पुष्पा भोईते देखील बदलण्यात आल्या आहेत. या अगोदर विद्या साळवे मामीची भूमिका साकारत होत्या. पण आता कल्याणी चौधरी या मामीची भूमिका साकारणार आहे.