मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कॅलेंडर गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली राऊतने आपला लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो आगी सारखा सोशल मीडियावर पसरत आहे. सोनालीने फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यावर अवघा काही वेळच व्हायरल व्हायला लागतो. अशीच काहीशी गोष्ट पुन्हा एकदा तिच्यासोबत पहायला मिळाली.
बिकिनीमध्ये झोपून दिल्या किलर पोज
सोनाली राउतने आपला एक लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत सोनाली ब्लॅक कलरची बिकिनी घालून पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये सोनालीने सिंपल मेकअप आणि हेअरस्टाईल ठेवत आपला लूक पुर्ण केला आहे.
सोनालीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि नेटिझन्स तिच्या स्टाईलवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये पाहिलं तर सोनालीचे चाहते तिच्या हॉटनेसची चर्चा करताना थकत नसल्याचं दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीच्या या फोटोला आतापर्यंत 38 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोकं सोनालीच्या या स्टाईलची उर्फी जावेदच्या लूकशी तुलना करत आहेत.
वयाच्या 19 व्या वर्षी कॅलेंडर गर्ल
सोनाली राऊतने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर सोनालीच्या प्रत्येक फोटोला आणि व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ती किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली. मात्र, 'बिग बॉस'च्या 8 व्या सीझनपासून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
सोशल मीडियावर एक्टिव
जरी सोनाली फिल्मीदुनियेपासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आणि आपले एका पेक्षा एक सिजलिंग फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.