मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची थिएटरमध्ये गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
काश्मिरी पंडितांची कहाणी विवेक अग्निहोत्री यांनी मोठ्या पडद्यावर अशा प्रकारे दाखवली आहे की या चित्रपटाने सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. मात्र, या चित्रपटालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आता विवेक अग्निहोत्रीने 'द काश्मीर फाइल्स'मोफत दाखवण्याबाबत ट्विट केले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये हरियाणाचे रेवाडीचे अध्यक्ष केशव चौधरी, युवा नेते मुकेश यादव कपरीवास आणि माजी आमदार रणधीर सिंह कपरीवास मोठ्या पडद्यावर 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट मोफत दाखवण्याबाबत बोलत आहेत. पोस्टरमध्ये ठिकाण आणि वेळ सांगून प्रेक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
हे पोस्टर विवेक अग्निहोत्री यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ ट्विट करत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांना हे थांबवण्याची विनंती केली आहे.
विवेकने लिहिले, "सावधान, 'द कश्मीर फाइल्स' अशा पद्धतीने विनामूल्य दाखवणे गुन्हा आहे. प्रिय मनोहर लाल जी, मी तुम्हाला हे थांबवण्याची विनंती करतो. राजकीय नेत्यांनी क्रिएटिव्ह बिझनेसचा आदर केला पाहिजे.
खरी देशभक्ती आणि समाजसेवा म्हणजे कायदेशीर आणि शांततेने तिकीट खरेदी करणे आणि सिनेमा पाहणे." या ट्विटच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने विवेक अग्निहोत्रीची ही गोष्ट चुकीची सांगितली आहे.
WARNING:
Showing #TheKashmirFiles like this in open and free is a CRIMINAL OFFENCE. Dear @mlkhattar ji, I’d request you to stop this. Political leaders must respect creative business and true Nationalism and Social service means buying tickets in a legal and peaceful manner. pic.twitter.com/b8yGqdrmUh— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 20, 2022
एक नेटकरी म्हणतो, "काही रोजंदारी कामगारांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते हा अप्रतिम चित्रपट अशा पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत विवेक अग्निहोत्री यांनी खूश असायला हवं.
पण विवेक अग्निहोत्री यांच्या मते हा सिनेमा अशा पद्धतीने खुल्यावर दाखवणं हा एक गुन्हा आहे. जर एखाद्या सिनेमाचे मालकी हक्क नसतील, तर तिकीटाशिवाय हा सिनेमा पाहणं चुकीचं आहे. कारण एखादा सिनेमा अशा पद्धतीने दाखवण्याला सिनेमाची पायरसी म्हटलं जाईल.