Taarak Mehta मालिकेतील कलाकारांच्या रिअल लाईफमधील मुलांना तुम्ही पाहिलंय का?

तारक मेहता यांचे जिवलग मित्र जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांचे एक छोटेसे कुटुंब आहे,

Updated: Feb 10, 2022, 01:54 PM IST
Taarak Mehta मालिकेतील कलाकारांच्या रिअल लाईफमधील मुलांना तुम्ही पाहिलंय का? title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रसिद्ध कॉमेडी शो गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक चेहरे या शोमध्ये आले आणि गेले, परंतु सर्वांनी प्रेक्षकांच्या हृदयावर आपली छाप सोडली आहे.

या शोमधील तारक मेहताच्या जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी पासून दिशा वाकाणीपर्यंत काही कलाकारांच्या खऱ्या आयुष्‍यातील मुलांचे फोटो पाहणार आहोत.

अमित भट्ट या शोमध्ये बापूजींची भूमिका साकारत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही ते ही व्यक्तिरेखा चोख बजावत आहे. अमित भट्ट यांना खऱ्या आयुष्यात दोन जुळी मुले आहेत.

तारक मेहता यांचे जिवलग मित्र जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांचे एक छोटेसे कुटुंब आहे, ज्यात त्यांची मुलगी नियती आणि मुलगा ऋत्विक यांचा समावेश आहे. नुकतेच जेठालाल यांच्या मुलीचे लग्न झाले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

जेठालालबद्दल बोलताना दयाबेनचा उल्लेख नक्कीच येईल. दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणी यांना एक सुंदर मुलगी आहे, तिचे नाव स्तुती असे सांगितले जाते. यावेळी दिशा वाकाणी आपला सगळा वेळ फक्त मुलीलाच देत आहेत.

शैलेश लोढा गेल्या 13 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये मेहताची भूमिका साकारत आहेत. शोमध्ये त्यांना अजून एकही मूल नाही, पण खऱ्या आयुष्यात ते स्वरा या मुलीचा बाबा आहे.

पोपटलाल तारक मेहता का उल्टा चष्मा मधील बॅचलर आहे, परंतु वास्तविक जीवनात तो केवळ विवाहित नाही तर तीन मुलांचा वडील देखील आहे.पोपटलाल यांचे खरे नाव श्याम पाठक आहे, त्यांनी प्रेमविवाह केला आणि त्यांना एक मुलगी नियती आणि दोन मुले पार्थ आणि शिवम आहेत.

सेलिब्रिटी किड असल्यामुळे या कलाकारांची मुलं देखील बऱ्याचदा चर्चेत असतात.