छोटा नवाब तैमूर भडकला फोटोग्राफर्सवर...नेटकरी म्हणतात...

तैमूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून तैमूरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Updated: Apr 24, 2022, 08:00 AM IST
छोटा नवाब तैमूर भडकला फोटोग्राफर्सवर...नेटकरी म्हणतात... title=

मुंबईः सैफ आणि करिनाचा मोठा मुलगा म्हणजेच तैमूर हा नेहमीच चर्चेत असतो..त्याचा क्यूट अंदाज कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी माध्यमांची नेहमीच धडपड सुरू असते. 

पण तैमूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून तैमूरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

बॉलिवूड स्टार किड्सची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर सुरु असते. त्यात करीना कपूरचे लाडके तैमूर आणि जहांगीर तर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

सोशल मीडियावर सध्या तैमूर आणि जहांगीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत जेह त्याची टॉय कार चालवत असल्याचे दिसत आहे.या व्हिडीओच्या सुरुवातीला तैमूर फोटोग्राफर्सला “शूट करणं बंद कर दादा” असं बोलताना दिसतं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 तैमूरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. काही नेटकऱ्यांनी त्याच्यात संस्कार नाही असं म्हटलं आहे.
दरम्यान, करीना लवकर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती सुजॉय घोषच्या दिग्दर्शित चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.