Suniel Shetty Gifts Bungalow : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी समाज सेवा तर करतो. त्याशिवाय इंडस्ट्रीमधील अनेकांना तो मदत करताना दिसतो. पण कधीच त्याविषयी तो बोलत नाही. आता त्याच्या विषयी लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडानं एक खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्या यशात सुनील शेट्टीचा मोठा वाटा आहे. त्यांनी भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की कशा प्रकारे सुनीलनं त्यांना 'हीरो' चित्रपटा दरम्यान, संपूर्ण ऑफिस सेट करण्यासाठी मदत केली होती. सुनील शेट्टीनं थेट त्याचा बंगला दिला होता.
मुकेश छाबडा यांनी भारती आणि हर्ष लिम्बाचियाच्या यूट्यूब चॅनलवर सुनील शेट्टीची स्तुती करत सांगितले की 'जेव्हा मी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करणं सुरु केलं, तेव्हा सुनील शेट्टी हा मुंबईतील सगळ्यात चांगल्या व्यक्तींपैकी एक होते. त्याचं अराम नगरमध्ये 160 नावाचा एक बंगला होता. त्यावेळी मी त्याची लेक अथिया शेट्टीसोबत एक चित्रपट करत होतो. हीरो त्या चित्रपटाचं नाव आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू इतक्या छोट्याश्या ऑफिसमध्ये का काम करतोय, माझं अराम नगरमध्ये एक बंगला आहे, तो घे. मी त्यांना म्हटलं की मी दबावमध्ये आहे. तर त्यांनी सांगितलं की चिंता नको करूस, फक्त चांगलं काम करत रहा.'
मुकेश छाबडानं पुढे सांगितलं की 'तो माणूस त्याच्या चांगल्या कामाविषयी कोणाला सांगत नाही. त्यानं मला अराम नगरमध्ये इतका मोठा बंगला दिला. त्यानं हे देखील सांगितलं की भाड्याची चिंता करु नकोस. तू माझ्या मुलीसाठी खूप काही केलं आहेस, फक्त हा बंगला घे. मी तिथे माझ्या कामाची सुरुवात केली, नवीन ऑफिसला सजवणं, नवीन लोगो बनवणं आणि ऑफिसचं उद्घाटन केलं. जेव्हा मी उद्घाटन केलं तेव्हा राजकुमार रावसारखे अनेक अभिनेते आले.. मी माझ्या जवळच्या मित्रांसोबत मिळून काम केलं आणि कंपनी बनवली. हळू-हळू आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो की आता आमचं चंडीगढ, दिल्ली आणि लंडनमध्ये आमचे दोन ऑफिस आहेत.'
हेही वाचा : ही दुसरी पत्नी शुराची मुलगी आहे? अरबाज खानचा 'त्या' मुलीसोबतचा VIDEO मुळे एकच चर्चा
अथियानं निखिल अडवाणी यांच्या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हीरो' या चित्रपटातून आदित्य पंचोलीच्या सूरज पंचोलीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर जेव्हा 'मुबारकां' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सारखे चित्रपटांमध्ये अथिया दिसली होती. अथियानं क्रिकेटपटू केएल राहुलशी लग्न केलं. अथियाचा भाऊ अर्थात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीनं देखील मिलन लूथरियाच्या 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमॅन्टिक अॅक्शन चित्रपट 'तडप'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.