Suhana Khan Skating Video : सध्या सुहाना खानची बरीच चर्चा आहे कारण तिचा 'द आर्चिजस' हा आगामी चित्रपट अवघ्या काही दिवसांनी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची बरीच चर्चा होती किंबहुना यातून सुहाना खानसोबत अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर हे दोन स्टार कीड्सही या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटातील काही लोकप्रिय गाणीही प्रसिद्ध झाली आहेत. या गाण्यांमागील बिहाईंड द सीन्स रील्सही व्हायरल झाले आहेत त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. यापैंकी एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी चित्रपटातील 'ढिशूम ढिशूम' गाण्याची बरीच चर्चा आहे. या गाण्यात सुहाना खान, खुशी कपूर आणि चित्रपटातील इतर अभिनेत्रींनी स्केटिंग केले आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही या व्हिडीओतून दिसते आहे.
सध्या 'ढिशूम ढिशूम' या गाण्यासाठी सुहानानं केलेली मेहनत पाहून सगळ्यांनाच आनंद आणि आश्चर्य वाटतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की फारच हेवी वजनाचे स्केटिंग त्यांनी घातलेले आहेत. यावेळी सुहाना खान, खुशी कपूर, अदिती डॉट या अभिनेत्री या गाण्यातील डान्सस्टेपसाठी मेहनत घेत आहेत. स्केटिंग घालून अनेकदा पडूनही त्या सर्वच जणी परत उभ्या राहिल्या आहेत हे त्यांचे धैर्य पाहून सगळेच जणं त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी अभिनेत्री झोया अख्तरचीही बरीच चर्चा आहे. तिनंही यावेळी चांगलीच कमेंट केली आहे. यावेळी ती म्हणते की, 'तुम्ही कितीही वेळा खाली पडलात तरीसुद्धा तुम्ही उभ्या राहत आहेत. तुमच्यासाठी खूप आदर'. तिच्या या कमेंटवरलाही अनेकांनी लाईक केले आहे.
शाहरूख खानची सध्या जोरात चर्चा रंगलेली असते. त्यातून आता त्याच्या लेकीचीही बरीच चर्चा आहे. सुहाना खानचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसतात. यावेळी तिच्या या नव्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं अनेक इव्हेंटही होताना दिसत आहेत. यावेळीही तिचे डान्सचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
सुहाना खान या चित्रपटातून व्हेरोनिकाची भुमिका करताना दिसते आहे. द आर्चिज या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. हे एक पाश्चमात्त्य कॉमिक आहे. ज्यावरील फिल्म आता भारतात येते आहे.