Sridevi Birth Anniversary : बॉलीवूडची चांदणी आणि हवा हवाई गर्ल श्रीदेवी आज आपल्यामध्ये नाही. आजच्या दिवशी श्रीदेवा चा (Sridevi Birth Anniversary) तामिळनाडूमधील एका गावात जन्म झाला होता. त्या काळाती सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रियक अभिनेत्री म्हणून तिने आपली ओळख बनवली होती. पण अभिनेत्रीने या ग्लॅमर दुनियेची काळी बाजूही जगा समोर आणली होती. इंडीस्ट्रीमध्ये तीदेखील लैंगिक छळाची शिकार झाल्याचा खुलासा तिने केला होता. (Sridevi birth anniversary revealed dark truth of bollywood and Janhvi Kapoor Post Happy Birthday Amma)
श्रीदेवी चित्रपटातील भूमिकेला पडद्यावर उतरविण्यासाठी जीव ओवाळून टाकायची. अगदी लहान वयात कॅमेऱ्यासमोर तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. तिने 300 हून अधिक चित्रपटात काम करुन चाहत्यांचा मनावर राज्य केलं. खरं तर श्रीदेवी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी बोलायची. पण तिने बॉलीवूडच्या काळ्या बाजूचा खुलासा तिने केला होता.
मीडिया रिपोर्टनुसार एका मुलाखतीदरम्यान श्रीदेवी खूप मोकळेपणाने बोलली. त्यावेळी तिने सांगितलं होतं की, ''तिच्यासोबत अभिनेत्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. तिने त्याला विरोध केला तेव्हा अभिनेत्याला हे सहन झालं नाही. त्याने श्रीदेवीच्या पायावरून त्याची जीप नेली होती.''
श्रीदेवी पुढे म्हणाली की ''लोकांना वाटतं मला सगळं सहज मिळालं. मी काहीच अनुभव घेतलेला नाही. तर माझ्या आयुष्यात मी अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला आहे.''
श्रीदेवी केवळ तिच्या रील लाइफसाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असायची. तिने बॉलिवूड चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हती. 'मिस्टर इंडिया' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होतं असं म्हणतात. बोनी यांचं आधीच लग्न झालं होतं. श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी त्यांनी पहिली पत्नी मोना कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं.
दरम्यान श्रीदेवी मोठी मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर श्रीदेवीसोबतचा तिचा लहानपणीचा फोटो शेअर करत Happy Birthday Amma असं म्हटलं आहे.
Happy Birthday Amma ! pic.twitter.com/5tpGH8466H
— Janhvi Kapoor (@janhvikapoorr) August 13, 2023
श्रीदेवीचं निधन 2018 मध्ये दुबईतील एका हॉटेलमध्ये झालं होतं. हॉटेलमधील बाथटबमध्ये तिचा मृत्यू झाला होता.
तिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. ती या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.