मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दक्षिणेत लोकांच्या मनात घर केल्यानेतर आता ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. 'मिशन मजनू' या चित्रपटामार्फत ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात रश्मिका सोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.
अगदी कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी रश्मिका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. दररोज आपल्या चाहत्यांसाठी ती मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी रश्मिकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
रश्मिकाने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये ती शेतात नांगरणी करताना दिसत आहे. रश्मिका अगदी आनंदात, जसे काय ती हे तिच्या आवडीचे काम ती मनापासून करताना दिसत आहे. तिचा लुकही पूर्णपणे एखाद्या ग्रामीण महिले सारखा आहे. तिने सैल असा शर्ट घातला आहे आणि कमरेवर टॅावेल गुंडाळला आहे. रश्मिकाचा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला.
व्हिडिओ शेअर करताना रश्मिकाने लिहिले - "गाण्याच्या शब्दांना ऐका आणि व्हिडिओ बघा. यापेक्षाही उत्तम काहीही असू शकत नाही. या सीनच्या शूटिंगनंतर मीसुद्धा असाच विचार करत होतो. मला स्वत:ला हे पात्र साकारण्यात किती मजा आली असेल? हे आपण पाहूच शकता. व्हिडिओच्या पाठिमागे Eppadi Iruntha Naanga हे गाणे सुरू आहे.
या आधी पोगारूमध्ये (Pogaru) केलं होत काम
सुपरस्टार ध्रुव सर्जाबरोबर (Dhruva Sarja) रश्मिका मंदाना पोगारू या साऊथ सिनेमामध्ये ती दिसली होती. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर वादात सापडला. या चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या काही सीन आणि संवादांबाबत ब्राह्मण समाजाने आक्षेप नोंदविला आहे.
हा वाद इतका वाढला की आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना 'पोगारू' मधून जवळपास 16 सीन काढावे लागले. हा चित्रपट 1 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु तो सध्या थिएटरमधून काढून टाकण्यात आला आहे.