मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडाचा 'लाइगर' हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 36.7 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता नुकतंच निर्मात्यांनी चित्रपट रिलीज झाल्यानंतर 'लाइगर'चे चौथं गाणं 'मेरा बनेगा तू' लाँच केलं आहे.
अनन्याने तिच्या इन्स्टा हँडलवर हे गाणं शेअर केलं आहे
वास्तविक, काही काळापूर्वी आलेलं हे गाणं अनन्याने तिच्या इन्स्टा हँडलवरून शेअर केलं आहे. हे गाणं शेअर करत अनन्या पांडेने लिहिलं आहे की, 'सोचा ना था... हे गाणं आपल्याला पुन्हा पुन्हा प्रेमात पाडू शकतं, हे माझं आवडतं गाणं आहे'. 3 मिनिटे 14 सेकंदाचं हे गाणं लक्ष कपूरने आपल्या आवाजाने सजवलं आहे. तर गाण्याचे बोल कुणाल वर्माने लिहिले आहेत. त्याचबरोबर गाण्याचं संगीत तनिष्क बागचीने दिले आहेत. रिलीज झालेल्या या चित्रपटाला आतापर्यंत 687,663 व्ह्यूज मिळाले आहेत.
हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं आहे .एवढेच नाही तर प्रेक्षक कमेंट करून विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'तुम्ही दोघे एकत्र खूप क्यूट दिसता, तुम्ही दोघे एकमेकांना डेट करू शकता का?' दुसर्या यूजरने लिहिलं की, 'तुम्ही आणि विजयने आता एकत्र रोमँटिक चित्रपट करावा'. या चित्रपटाद्वारे अनन्या पांडेने साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.