Sky Force Trailer Out : 2025 चा पहिला चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक करणार आहे. अक्षय कुमारला देशभक्तीपर चित्रपटांमध्ये देखील प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अशातच त्याच्या 'स्काय फोर्स' चित्रपटामधून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात अभिनेत्याशिवाय वीर पहाड़िया दमदार स्टाईलमध्ये दिसणार आहे. तो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय?
'स्काय फोर्स' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात रेडिओवर केलेल्या घोषणेने होते. ज्यामध्ये पाकिस्तानने भारताला युद्धाचे आव्हान दिले आहे. यानंतर, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दारूगोळ्याने भरलेल्या कारवाईमध्ये प्रवेश करतो. अभिनेता म्हणतो की हल्ल्यानंतर शेजाऱ्यांना सांगावे लागेल की आम्ही देखील आत घुसू शकतो आणि मारू शकतो. मात्र, भारत हा शांतताप्रिय देश असल्याने त्यांच्यासाठी हे मिशन सोपे जाणार नाही. अशातच वीर पहाड़ियाची दमदार एन्ट्री होते. ज्यामध्ये तो जोखीम घेताना दिसत आहे.
काय आहे चित्रपटाची कहाणी?
'स्काय फोर्स' या चित्रपटात तुम्हाला अनेक एरियल शॉट्स पाहायला मिळणार आहेत जे तुम्ही याआधी देखील अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असतील. या चित्रपटाचा संपूर्ण ट्रेलर पाहिल्यानंतर समजते की पाकिस्तानकडून बदला घेण्याची ही आणखी एक नवीन कथा आहे, ज्यामध्ये एक अधिकारी बेपत्ता होण्याची कहाणी दाखवली जाईल.
या चित्रपटात सारा अली खान ही वीर पहाड़ियाच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. यामध्ये त्या अधिकाऱ्याला शोधण्यात येते की नाही हे पहावे लागेल. त्याचबरोबर अक्षय कुमार त्या अधिकाऱ्याला शोधण्यासाठी काय करतो हे देखील बघावे लागेल. या चित्रपटात निम्रत कौर देखील दिसणार आहे.
या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
दिग्दर्शक संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित 'स्काय फोर्स' या देशभक्तीपर चित्रपटाबाबत आता प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. जिओ स्टुडिओ अंतर्गत दिनेश विजन, अमर कौशिक आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.