श्वेता तिवारीच्या आयुष्यात तिसऱ्यांदा प्रेमाची एन्ट्री? नेटकरी म्हणाले, 'आता मुलाच्या वयाच्या...'

Shweta Tiwari : श्वेता तिवारीच्या या फोटोला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

दिक्षा पाटील | Updated: Feb 19, 2024, 03:21 PM IST
श्वेता तिवारीच्या आयुष्यात तिसऱ्यांदा प्रेमाची एन्ट्री? नेटकरी म्हणाले, 'आता मुलाच्या वयाच्या...' title=
(Photo Credit : Social Media)

Shweta Tiwari : वयाच्या 43 वर्षी देखील अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत राहते. आपल्या फॅशनमुळे श्वेता नेहमीच चर्चेत असते. श्वेता तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील सगळ्यांचे लक्ष वेधताना दिसते. तिच्याविषयी कोणतीही गोष्ट असली तरी ती लगेच चर्चेत येते. आता पुन्हा एकदा श्वेता तिवारी तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या फोटो आणि व्हिडीओला पाहून ती आता एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आल्याचे म्हणत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. 

श्वेताचा हा फोटो अभिनेता वरुण कस्तूरियानं शेअर केला आहे. त्यानं शेअर केलेला हा फोटो मिरर सेल्फी आहे. वरुण कस्तूरियासोबत दिसत आहे. या फोटोत दोघं खूप क्लोज असल्याचे पाहायला मिळते. त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरंतर, श्वेता तिवारी तिच्या मित्रांसोबत मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी श्वेताला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधी श्वेता तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसली. श्वेताचे हे फोटो आणि व्हिडीओ गोव्यातील आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेटकऱ्यांनी श्वेता आणि वरुणचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत ट्रोल केलं. एक नेटकरी म्हणाला, 'अरे, मॅडम आता स्वत: च्या मुलाच्या वयाच्या मुलाला डेट करतेस?' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू कधीच सुधरणार नाही.' तर तिसरा नेटकरी म्हणाला, 'हा तिचा नवा बॉयफ्रेंड आहे का?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ती आता एका मुलाला डेट करते.' तर दुसरीकडे वरुण कस्तुरियानं हा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की 'सुर्यास्त आणि बिचचा आनंद घेत आहे. #Goa 2.0 #motherandson' 

हेही वाचा : तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लढवणार निवडणूक!

दरम्यान, त्या दोघांना फक्त एकत्र बघून कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिचे चाहते वैतागले आणि काही नेटकऱ्यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. एक नेटकरी म्हणाला, 'त्यानं हॅशटॅगमध्ये काय लिहिलं आहे ते वाच.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्यांनी म्हटलंय आई आणि मुलगा. तर तुम्ही का अशा कमेंट करत आहात.'