Pornography Case: राज कुंद्राची कधी होणार सुटका, 16 सप्टेंबरला कोर्टात सुनावणी?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा 19 जुलै 2021 पासून तुरुंगात आहेत.

Updated: Sep 9, 2021, 12:56 PM IST
Pornography Case: राज कुंद्राची कधी होणार सुटका, 16 सप्टेंबरला कोर्टात सुनावणी? title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा 19 जुलै 2021 पासून तुरुंगात आहेत. राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं बोललं जात आहे. अहवालांनुसार, 8 सप्टेंबरला राज कुंद्राच्या वकिलांनी न्यायालयाकडून पुढील तारीख मागितली, त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख 16 सप्टेंबर देण्यात आली.

दुसरीकडे, पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव आल्यापासून शिल्पा शेट्टीही सतत चर्चेत आहे. 'सुपर डान्सर' मधून एक महिन्यापेक्षा जास्त काळ कामापासून विश्रांती घेतल्यानंतर, शिल्पाने पुन्हा शूटिंग सुरू केले आहे, पण हे खरे आहे की अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याव्यतिरिक्त तिच्या व्यावसायिक आयुष्यावरही ही याचा खोलवर परिणाम झाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडेच अशी बातमी देखील आली की शिल्पा शेट्टी आता तिचे आणि तिच्या मुलांचे आयुष्य पती राज कुंद्राचे घर सोडून निघण्याच्या विचारात आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या मित्रांनी दावा केला आहे की ती राज कुंद्रापासून दूर आयुष्याची योजना ती आखत आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे 2009 मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना मुलगा वियान आणि मुलगी समीशा अशी दोन मुले आहेत.