महाराजांना 'शिवाजी' म्हणणाऱ्या पत्रकाराला शरद केळकरचं उत्तर

शरद केळकरचं चाहत्यांकडून कौतुक 

Updated: Nov 20, 2019, 08:06 AM IST
महाराजांना 'शिवाजी' म्हणणाऱ्या पत्रकाराला शरद केळकरचं उत्तर  title=

मुंबई : हिंदी टेलिव्हीजनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj ) उल्लेख 'शिवाजी' असा एकेरी केला जात आहे. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यानंतर एका हिंदी पत्रकार महिलेने देखील महाराजांचा शिवाजी असा उल्लेख केला. या पत्रकार महिलेले अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) ने दिलेलं सडेतोड उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत असून केळकरचं कौतुक होत आहे. 

अजय देवगणच्या 'तान्हाजी' (Tahaji Trailer) सिनेमाच्या ट्रेलर दरम्यानचा हा व्हिडिओ आहे.  एका पत्रकार महिलेने शरद केळकरला त्याने सिनेमात साकारत असलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला. त्याला शरद केळकरने हसतं पण अगदी उत्तम उत्तर दिलं आहे. (मुघलांना हादरवणाऱ्या थराराची गोष्ट; पाहा 'तान्हाजी'चा ट्रेलर) 

पत्रकार - आप शिवाजी का रोल प्ले कर रहे है?

शरद केळकर - (हसत) छत्रपती शिवाजी महाराज.... 

पत्रकार - हा... छत्रपती शिवाजी.... I am Sorry... 

यावेळी अभिनेता शरद केळकरने अतिशय नम्रपणे पत्रकार महिलेला बरोबर केल्यामुळे फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर मंचावर उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींकडून लक्ष वेधलं आहे. अभिनेता सैफ अली खानची प्रतिक्रिया देखील अतिशय बोलकी होती आणि चाहत्यांनी टाळया वाजवून शरद केळकरचं कौतुक केलं. अभिनेता शरद केळकर 'तान्हाजी' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

एखाद्या कलाकरासाठी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पेहरावात त्यांची देहबोली साकारण्याऐवढी भाग्याची आणि पवित्र गोष्ट कुठलीच नाही.... हर हर महादेव... Chhatrapati Shivaji Maharaj - Patthar se thokar toh sab khate hain, patthar ko thokhar maare woh Maratha! #TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020. #TanhajiTrailerOnNov19 @ajaydevgn @kajol #SaifAliKhan @omraut @sharadkelkar @bhushankumar #AjayDevgnFFilms @tseries.official @tseriesfilms @tanhajifilm #KrishanKumar

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

काही दिवसांपूर्वी अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर एका प्रश्नाच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी 'शिवाजी' असा केला. यानंतर सोशल मीडियावरून आणि सामान्यांकडून बिग बींवर टीका झाली. त्यांना ट्रोल करून बॉलिवूडच्या शहनशाहकडून अशी अपेक्षा नसल्याची खंत व्यक्त केली. यानंतर अभिनेता अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात सविस्तर माफी मागितली.