मुंबई : 'एक सच्चा राजा ये सोचता है, की वो क्या दे सकता हैं' एक राजा आपले कर्तव्य साधण्यासाठी किती कष्ट करतो, त्याचप्रमाणे कोण- कोणत्या समस्यांना सामोरे जातो या सर्वांचा प्रत्येय 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. अॅनिमेशच्या जगात साकारण्यात येणाऱ्या या चित्रपटाला आवाज खुद्द किंग खान अभिनेता शाहरूख खान आणि मुलगा आर्यन खान यांनी दिला आहे. मुफासा या व्यक्तीरेखेला शाहरूखने आवाज दिला आहे, तर सिम्बा या व्यक्तीरेखेला आर्यनने आवाज दिला आहे.
'सिम्बा-द लायन किंग' चित्रपट हिंदी, तेलुगू, इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. चित्रपटाबद्दल बोलताना शाहरूख म्हणाला की, 'चित्रपटाची कथा मनोरंनात्मक आहे. चित्रपटाची कथा नाते संबंधांभोवती फिरताना दिसत आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांसोबत मोठे होत असतात, तेव्हा त्यांच्या कडून काय मिळतं त्याकडे कित्येकदा दुर्लक्ष करतात. परंतू मुलांना काही काळानंतर त्या गोष्टी कळतात. पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. '
काय आहे 'सिंबा-द लायन किंग' चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा एका लहान सिंहावर आधारलेली आहे. त्याचे नाव सिंबा असे आहे. सिंबाचे आई-वडील त्यावर अपार प्रेम करत असतात. त्यामुळे सिंबाचे काका त्याच्यावर मत्सर करत असतात. कारण त्यांना भिती असते की, सिम्बाचे वडील मुफासा त्यांची पूर्ण सत्ता सिम्बाला देतील आणि सिम्बा राजाच्या गादीवर विराजमान होईल. सत्ता आपल्या काबीज करण्यासाठी ते मुसाफाच्या हत्येचा कट रचतात आणि सिम्बाला राज्यातून जाण्यास सांगतात.
अशा प्रकारे नात्यामागे दडलेली कथा 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाच्या मध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्यानंतर सिम्बा पुन्हा आपल्या वडिलांचे राज्य मिळवीण्यात कशा प्रकारे यशस्वी ठरतो. हे चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'सिम्बा-द लायन किंग' १९ जून मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे.