सलमानच्या अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्ती घुसल्याने खळबळ

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केल्याने खळबळ उडाली. अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहम्मद सिराजुद्दीन असे आहे. त्याचे वय सुमारे 25 वर्षे आहे.

Updated: Jun 11, 2017, 06:52 PM IST
सलमानच्या अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्ती घुसल्याने खळबळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केल्याने खळबळ उडाली. अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहम्मद सिराजुद्दीन असे आहे. त्याचे वय सुमारे 25 वर्षे आहे.

सुरक्षारक्षक काही कारणामुळे आत गेले असता सिराजुद्दीनने सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. थोड्यावेळाने गार्डने सिराजुद्दीनला पकडून वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो मानसिकरित्या असक्षम असल्याचं आढळून आला. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आलं.