कपूर कुटुंबातच्या सुनेच्या One Night Standची गोष्ट... पुढं जे घडलं ते सारंकाही अनपेक्षितच!

Sanjay Kapoor's Wife : महीप कपूरनं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 16, 2024, 05:15 PM IST
कपूर कुटुंबातच्या सुनेच्या One Night Standची गोष्ट... पुढं जे घडलं ते सारंकाही अनपेक्षितच! title=
(Photo Credit : Social Media)

Sanjay Kapoor's Wife Maheep Kapoor : नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवुड वाइव्स’ या सीरिजनं सगळ्यांची मने जिंकली. या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नी दिसल्या. त्यापैकी एक महीप कपूर आहे. महीप कपूर ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सगळ्याच विषयांवर महीप ही तिला जे वाटतं ते बोलताना दिसते. महीपनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा नवरा संजय कपूरच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरविषयी सांगितलं आहे. त्याशिवाय तिच्या वन नाईट स्टॅंडविषयी सांगितलं आणि तिचं आणि संजय कपूरच्या लग्नाविषयी सांगितलं. 

महीपनं रौनक रजनीच्या शोमध्ये हजरे लावली होती. त्यावेळी महीपला तिच्या आणि संजयच्या लव्ह स्टोरीविषयी विचारलं तेव्हा ती संजयला कशी भेटली आणि मग वन नाइट स्टॅंड कसं झालं आणि त्या वन नाईट स्टॅंडमुळे त्यांचं लग्न कसं झालं याविषयी सांगितलं. त्या दोघांची लव्ह स्टोरी ही दारूच्या नशेनं सुरु झाली होती. 'आमची लव्ह स्टोरी ही खूप साधी-सोपी आहे. मी त्या व्यक्तीसोबत वन नाइट स्टॅंड केलं आणि मला कधीच माहित नव्हतं की माझं त्याच्याशी लग्न होईल. मी त्याच्या पार्टीत गेले आणि तिथेच माझी आणि त्याची भेट झाली. मी नशेत होते', असं महीपनं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

महीपनं पुढे सांगितलं की 'मी संपूर्ण कुटुंबाला भेटले, सासू-सासरे... तुम्ही माझ्या कुटुंबातील लोकांना ओळखताना? अनिल कपूर, सुनीता, श्री देवी आणि मी नशेत होते तरी सुद्धा त्या लोकांनी मला स्वीकारलं आणि सांगितलं की व्वा, काय सून आहे. त्यांनी मोठ्या मनानं मला स्वीकारत माझं स्वागत केलं. आमच्याकडे प्रपोजल वगैरे नव्हते. आमच्याकडे इन्स्टाग्राम नव्हतं, त्यामुळे आम्ही कोणत्याच गोष्टीची काळजी घेतली नाही. त्यानं मला फक्त इतकंच सांगितलं की हे बघ, आपण लग्न करतोय. त्यानं परत विचारायला हवं होतं अशी माझी इच्छा होती. तर अशी शक्यता आहे की मी म्हणाले असते नाही, मी पुन्हा असं करणार नाही आणि आता 30 वर्ष झाली.'

हेही वाचा : यूट्यूबर अरमान मलिक मुलांच्या नॅनीला करतोय डेट; पुन्हा करणार लग्न? ती म्हणाली; 'हे सगळं आईला...'

या दिवसांना आठवत संजयनं सांगितलं की संजयनं तिला लग्नाविषयी विचारलं आणि महीपनं सांगितलं की 'आम्ही 90 च्या दशकात कोलाबा ताजच्या एका नाइट क्लबमध्ये होतो. आम्ही नशेत होतो. आम्ही पार्टी करत असताना त्यानं थेट विचारलं की ठीक आहे, आपण लग्न करतोय आणि मी माझे टकीला शॉट्स घेत असताना मध्येच त्याला ठीक आहे ठीक आहे म्हटलं. फक्त इतकंच नाही. आम्ही सोशल मीडियावर प्रपोज केलं नाही.'