Salman Khan नं सिमी गरेवालसमोर केलं कबूल, लव्ह लाइफविषयी दिलं 'हे' उत्तर

Salman Khan नं मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे.

Updated: Jan 16, 2023, 12:59 PM IST
Salman Khan नं सिमी गरेवालसमोर केलं कबूल, लव्ह लाइफविषयी दिलं 'हे' उत्तर title=

Salman Khan Relationship : बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल (Simi Garewal) आता 'बिग बॉस 16' मध्ये दिसणार आहे. यावेळी सिमि गरेवालनं बॉलिवूडचा भाईजान सलमानची खानची (Salman Khan) मुलाखत घेतली. त्यामुळे केवळ सलमान नाही तर सिमिनं देखील घरातील सदस्यांशी अनेक प्रश्न विचारले. यावेळी सिमी यांनी सलमानला त्याच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले आहेत. प्रेक्षक सिमीला तिच्या सेलिब्रिटी टॉक शो Rendezvous with Simi Garewal मधून ओळखतात. सिमीचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

या प्रोमोमध्ये सिमी गरेवाल या सलमानला विचारताना दिसत आहेत की 'बिग बॉस स्पर्धक बनवण्यासाठी तुला काय करावं लागेल? यावर उत्तर देत सलमान म्हणतो, 'मी यातून थोडा मोठा झालो आहे.' पुढे सिमी गरेवाल म्हणतात, 'तुझा कधी तुझ्या लव्ह लाइफमध्ये गोंधळ उधळला का? जसे की टीना आणि शालीन गोंधळले आहेत.' यावर उत्तर देत सलमान म्हणाला, 'तो नेहमीच गोंधळात असतो.' तो म्हणाला की 'हे लोक तर अशा परिस्थितीत गोंधळले आहेत मी तर माझ्या रोजच्या जीवनात गोंधळत असतो.' दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सिमी यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. तर सलमाननं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. 

हेही वाचा : Bollywood नंतर डी गँगच्या Tollywood मध्ये कुरापती! NIA चा मोठा खुलासा

सिमी गरेवालने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिमी ग्रेवाल यांनी मेरा नाम जोकर, दो बदन, सिद्धार्थ आणि कर्ज यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकेकाळी सिमी गरेवालचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चा होत्या.

सिमी यांनी तीन महिने लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बिझनेसमन रवी मोहनसोबत लग्नबंधनात अडकल्या. पण त्यांचं हे लग्न काही काळचं टिकलं. लग्नापूर्वी सिमी गरेवाल या जामनगरच्या महाराज यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यावेळी त्या फक्त 17 वर्षांच्या होत्या. पण फार कमी लोकांना माहित असेल की सिमी गरेवाल एकेकाळी रतन टाटा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. सिमी गरेवाल यांनी एका मुलाखतीत रतन टाटा यांच्यासोबतच्या त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने सांगितले. 

सिमी गरेवाल यांनी 11 वर्षांपूर्वी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्या रतन टाटा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघे बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. रतन टाटांचे कौतुक करताना सिमी गरेवाल म्हणाल्या की, 'रतन आणि माझं खूप पूर्वीचे नाते आहे. ते एकदम पर्फेक्ट आहेत. त्यांची विनोदबुद्धी अप्रतिम आहे आणि ते पर्फेक्ट जेन्टलमन आहेत. त्यांच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता. ते परदेशात जेवढे आरामात राहतात तितके ते भारतात राहत नाही. 

सिमी गरेवाल यांनी रतन टाटांसोबत ब्रेकअप का केलं हे कधीच सांगितलं नाही, पण तरीही त्या त्यांचा आदर करतात. सिमी गरेवाल या बऱ्याचवेळा रतन टाटा यांचे कौतुक करतात. सिमी गरेवाल या मन्सूर अली खान पतौडीसोबतही रिलेशनशिपमध्ये होत्या. पण मन्सूर पतौडी यांच्या आयुष्यात शर्मिला टागोर यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाते तुटल्याचे म्हटले जाते. सिमी गरेवाल 1979 मध्ये त्यांच्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि त्या अजूनही अविवाहित आहे.