'रेस 3' मध्ये सलमान खानसोबत झळकणार इम्रान हश्मी

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान लवकरच 'रेस 3' च्या शूटींगला सुरूवात करणार आहे.

Updated: Oct 3, 2017, 05:16 PM IST
'रेस 3' मध्ये सलमान खानसोबत झळकणार इम्रान हश्मी

मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान लवकरच 'रेस 3' च्या शूटींगला सुरूवात करणार आहे.

या चित्रपटात एका भूमिकेसाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने नकार दिल्यानंतर त्याच्या जागी इम्रान हश्मीची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

'रेस ३' मध्ये सलमान खानसोबत जॅकलीन फर्नांडीस, डेजी शहा सोबत इम्रान हश्मी झळकण्याची शक्यता असल्याची माहिती बॉलिवूडलाईफने दिली आहे.  

इम्रानच्या आधी या भूमिकेसाठी आदित्य रॉय कपूर आणि सिद्धार्थ  कपूरचे नाव चर्चेत आले होते. त्यांनी नकार दिल्यानंतर या इम्रान हश्मीचे नाव फायनल झाले आहे. या चित्रपटामध्ये इम्रान आणि डेजी शहा रोमान्स करताना दिसणार आहे.