सायनाच्या बायोपिकसाठी श्रद्धाची कठोर मेहनत

 बॅडमिंटनपटू आणि फुलराणी सायना नेहवालच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. 

Updated: Aug 1, 2018, 12:05 PM IST
सायनाच्या बायोपिकसाठी श्रद्धाची कठोर मेहनत title=

मुंबई : बॅडमिंटनपटू आणि फुलराणी सायना नेहवालच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. पण या सिनेमाच्या शूटिंगमध्ये फारशी प्रगती दिसत नाहीये. पण या सिनेमात सायनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर काही महिन्यांपासून नियमित बॅडमिंटनचा सराव करत आहे. सायनाची भूमिका हुबेहुब साकारण्यासाठी श्रद्धा स्वतःला तयार करत आहे.

...म्हणून शूटिंगला लागतोय वेळ

वृत्तानुसार, श्रद्धाने सायनाच्या भूमिकेकडे अगदी गंभीरतेने पाहावे, अशी सायनाची इच्छा आहे. त्यामुळे सिनेमाला सुरुवात करण्यापूर्वी सायनाच्या जीवनाबद्दल श्रद्धा सर्व काही जाणून घेत आहे. 

सुत्रांनुसार, सायनाला बॅडमिंटनबद्दल विशेष माहिती नव्हती. पण पद्मभूषण सायना नेहवाल, श्रद्धा आणि सिनेमाच्या टीमसोबत सतत संपर्कात आहे. ती या सिनेमाच्या टीमला मदत करत आहे. त्याचबरोबर श्रद्धा जेव्हा सायनाची भूमिका साकारण्यासाठी पूर्णपणे तयार होईल तेव्हाच सायना या सिनेमासाठी परवांगी देईल, असे बोलले जात आहे. पण याबद्दल श्रद्धा कपूरकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

सरावातून वेळ काढणे कठीण

श्रद्धा कपूरही आपल्या कामाबद्दल अत्यंत जबाबदार आहे. सुत्रांनुसार, ती गेले २२ दिवस सातत्याने शूटिंग करत आहे. त्याचबरोबर तिचा बॅडमिंटनचा सरावही सुरु आहे. त्यातून वेळ काढणे कठीण होत आहे. 

या सिनेमातूनही श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीला

श्रद्धा कपूर अजून एका बल्ली गुल, मीटर चालू या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमाचे दिग्दर्शन निदेश तिवारी करत आहेत. यात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत आहे.