'भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशतवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप

Sai Pallavi on Indian Army :  साई पल्लवीनं चक्क भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी म्हणाली... त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओनंतर सगळ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 26, 2024, 11:58 AM IST
'भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशतवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप title=
(Photo Credit : Social Media)

Sai Pallavi on Indian Army : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही गेल्या अनेक दिवसांपासून नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात ती 'पाकिस्तानी लोकं भारतीय सेनेला दहशतवादी म्हणतात', असं म्हणाली आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. 

साई पल्लवीचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ जुना आहे. हा व्हिडीओ जानेवरी 2022 च्या मुलाखतीतील आहे. व्हिडीओमध्ये, 'साई पल्लवी हे बोलते की पाकिस्तानमधले लोक विचार करतात की आपली सेना ही दहशतवादी आहे. पण आपल्यासाठी तसं नाही. अगदी याच प्रमाणे आपल्यासाठी ते दहशतवादी आहेत. प्रत्येकाच्या विचारांवर किंवा आपण कोणत्या पद्धतीनं घेतो त्यावर अवलंबून आहे. महत्त्वाचं म्हणजे, मला हिंसा कळत नाही.'

दरम्यान, साई पल्लवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'भारतानं कधी दुसऱ्या देशांवर हल्ला केला आहे. ज्यामुळे त्याला दहशतवादी म्हटलं जाईल? तुम्हाला वाटतं नाही का की कायम भारताला पाकिस्तान आणि चीनच्या हल्ल्यापासून स्वत: च्या क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे? तर मग भारतीय सैनिकांना दहशतवादी का म्हणतील?' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'ही फार वाईट गोष्ट आहे की कम्युनिस्ट साई पल्लवी रामायणाक माता सीतेची भूमिका साकारणार आहे. तर असं म्हणत आहे की पाकिस्तानीचे लोक भारतीय सेनेला दहशतवादीच्या रुपात पाहतात. आधी तर हिनं गोरक्षकांची तुलना ही ओसामाशी केली होती.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ती त्या कट्टरपंकी व्यक्तिंपैकी एक आहे, ज्याचा मी कधी सामना केलेला नाही. तिला या सगळ्या गोष्टींविषयी बोलण्याची कोणतीही समज नाही की भारतीय सेना आपल्या देशाची सुरक्षा करते.' 'विवाहबाह्य संबंध...', ऐश्वर्या अभिषेकला लग्न टिकवण्यासाठी काजोलने कोणता सल्ला दिला?

हेही वाचा : 'विवाहबाह्य संबंध...', ऐश्वर्या अभिषेकला लग्न टिकवण्यासाठी काजोलने कोणता सल्ला दिला?

दरम्यान, साई पल्लवी ही 'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार यश हा रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. यशनं ही भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं इतकंच नाही तर त्याला ही स्क्रिप्ट आवडली म्हणून त्यानं होकार दिल्याचं त्यानं सांगितलं.