Saba Azad on Haters: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची. परंतु या रिलेशनशिपमध्ये असल्यानं सबा आझादला ट्रोलर्स हे प्रचंड ट्रोल करत आहेत. त्यामुळे यावेळी तिच्यावर हेटर्सचा बराच रोष असल्याचे दिसून आले आहे. तिच्या उंचीवरून तिला फार ट्रोल करण्यात आले. त्यातून ती हृतिकपेक्षा फार लहान असल्यानं, हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत की आईवडिल? सबा हृतिकची गर्लफ्रेंड नाही तर मुलगीच वाटते अशाप्रकारे तिला दूषणं देण्यात आली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. सबा आझाद ही उत्तम गायिका आहे आणि आजच्या युथला ती तिच्या गाण्यानं खूपच इस्पायर करते. त्याचसोबत ती खूपच चांगली नटी आहे. मागच्या वर्षी 'द रॉकेट बॉईज' या चित्रपटातून ती डॉ. होमी भाभा यांच्या पत्नीच्या भुमिकेतून दिसली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. हृतिक रोशनपुर्वी ती नसिरूद्दीन शहा यांचा मुलगा इमाद शहाला डेट करत असल्याची चर्चा होती.
त्यापुर्वाही तिची बरीच चर्चा होती. परंतु हृतिक रोशनसोबतच्या अफेअरनंतर त्या दोघांची आणि खासकरून तिची जोरात चर्चा रंगायला लागली होती. त्यातून तिला बऱ्याच प्रमाणात ट्रोलर्सनी ट्रोल करायला सुरूवात केली होती. त्यामुळे सबा आझाद ही कायमच चर्चेत राहिली होती. सध्या ती तिच्या What's Your Gynac? या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. यंदा माध्यमांशी बोलताना तिनं अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिनं हेटर्सविषयीही आपलं प्रामाणिक मत मांडलं आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे तिनं सांगितलेल्या आपल्या अनुभवांची. हेटर्सकडून रोष येतो तेव्हा नक्की काय भावना मनात असतात याविषयी तिनं खुलासा केला आहे.
हेही वाचा : ऋतुजा बागवेनं सांगितलं मुंबईपासून लांब घरं घेण्याचं कारण, म्हणाली, 'माझा स्वभाव...'
यावेळी 'इंडिया टुडे'शी बोलताना ती म्हणाली की, ''मला फारसं बाहेर जायला आवडतं नाही त्यातून मी जास्त घरातच बसते. परंतु जेव्हा आता मी बाहेर फिरते तेव्हा मला सुरूवातीला खरंच खूप भीती वाटत होती. मी खोटं बोलणार नाही.''
आपल्या हृतिक रोशनसोबतच्या रिलेशनशिपवरही ती बोलली आहे. त्यावरूनही तिला बऱ्याच अंशी तिरस्कार मिळतो आहे. यावेळी ती म्हणाली की, ''माझं हृदय काही दगडाचं नाही.. मलाही त्रास होतो. तुम्ही स्वत:ला खूपच कमी लेखता. तुम्हाला सकाळी उठल्यावर असं वाटतं की ही लोकं आपल्यासोबतच असं का करतात? मी काय बिघडवलंय तुमचं. मी माझं आयुष्य जगतेय. तुम्ही तुमचं जगा. माझ्या उरावर तुम्ही का आला आहात. पण शेवटी कळतं की यात तुमची काहीच चुक नाही. या सगळ्याशी तुमचा काहीस संबंध नाही. परंतु शांत आयुष्य हे महत्त्वाचं आहे.''