मुंबई : रवीना टंडन ही बॉलिवूडमधील हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करून हिट चित्रपट दिले आहेत. 90 च्या दशकात रवीना टंडनने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र एक वेळ अशी आली होती जेव्हा तिला हिरोच्या प्रेयसीमुळे चित्रपटांमधून वगळण्यात आलं. हिरोच्या प्रेयसीच्या सांगण्यावरून हे केलं गेलं. रवीना टंडनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
अलीकडेच रवीना टंडनने एका मुलाखती दरम्यान, तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच काही सांगितलं. रवीना टंडन म्हणाली, 'मला चित्रपटातून मुद्दाम काढून टाकण्यात आलं कारण त्या मुलीला मी आवडत नव्हती, ती माझ्याबद्दल इनसिक्योर होती. ती त्यावेळी माझ्या सिनेमातील हिरोला डेट करत होती आणि तिने हिरोला मला सिनेमातून काढून टाकण्यासाठी भाग पाडलं. कारण आम्ही हिट कपल होतो. माझ्या जागी इतर हिरोईन्स घ्यायला भाग पाडलं. त्यामुळे मला 1-2 चित्रपट गमवावे लागले. मी यावेळी त्या दोघांची नावं घेणार नाही असंही अभिनेत्री म्हणाली.
रवीना टंडन पुढे म्हणाली, 'मग त्या मुलीने त्या हिरोवर दुसऱ्या चित्रपटातही माझ्यासोबत काम न करण्यासाठी दबाव आणला, यानंतर तो हिरो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, 'अरे माझी गर्लफ्रेंड माझ्याकडे आली आणि खूप रडली आणि म्हणू लागली की, मी तुझ्या जुन्या गँगमधून आहे. आणि तुम्ही तिला कसं काय घेतलं. ती खूप रडली वैगरे. मला आणि दिग्दर्शकाला वाटलं ठीक आहे, थोडी दया दाखवू.
यानंतर रवीना टंडनने सांगितलं की, काही वर्षांनी त्या मुलीने हिरोसोबत ब्रेकअप केलं. अभिनेत्री म्हणाली, ''सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिनेच हिरोला काही वर्षांनी सोडलं आणि तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, अरे तिचा सिनेमा आहे यार, तू प्लीज आता माझ्यासाठी हा चित्रपट कर. ती मध्येच मला सोडून गेली. यावर रवीना टंडन हिरोला म्हणाली, 'मी तुला आधीच सांगायचे की तिचा स्वभाव असा आहे.'
याशिवाय रवीना टंडनने ईतरही अनेक गोष्टी सांगितल्या. रवीना टंडन पूर्वी तिच्या पहिल्या वेब सीरिजमुळे चर्चेत होती. या वेब सीरिजद्वारे अभिनेत्रीने ओटीटीमध्ये पदार्पण केलं आहे. अरण्यक या रहस्यमय-थ्रिलर सिरीजमध्ये रवीना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली आहे. विनय वैकुल दिग्दर्शित मालिकेची स्टोरी सिरोनाच्या डोंगराळ प्रदेशात बेतलेली आहे. या मालिकेत आशुतोष राणा, झाकीर हुसेन, मेघना मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.