रणबीर कपूरचे 'धूम 4' मध्ये आगमन? हटके लूक, डबल अ‍ॅक्शन आणि दोन लीड अभिनेत्री

यशराज फिल्म्स आपल्या सुपरहिट धूम फ्रँचायझीचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांसाठी सादर करण्याच्या तयारीत आहे. रणबीर सध्या 2025-2026 मध्ये रिलीज होणाऱ्या विविध चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये 'रामायण', 'लव्ह अँड वॉर' आणि 'अ‍ॅनिमल पार्क' सारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर, धूम 4 मध्ये त्याच्या एक मोठा अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Intern | Updated: Jan 14, 2025, 01:25 PM IST
रणबीर कपूरचे 'धूम 4' मध्ये आगमन? हटके लूक, डबल अ‍ॅक्शन आणि दोन लीड अभिनेत्री title=

Ranbir kapoor's upcoming movies: 

धूम 4 मध्ये रणबीर कपूर एक नवा, हटके लूक घेऊन येणार आहे अशी चर्चा सुरु झाल्या आहेत. लूकमधये काही खास विशेषता असू शकते, ज्यामुळे तो त्याच्या भूमिकेला अधिक प्रभावीपणे सादर करेल. काही अफवांनुसार, चित्रपटात रणबीर एक गुन्हेगार किंवा एक हिरोच्या भूमिकेत दिसू शकतो, जो धूम फ्रँचायझीमधील इतर पात्रांपेक्षा वेगळा असू शकतो. 

दुसरे महत्वाचे अपडेट म्हणजे धूम 4 मध्ये दोन लीड एक्ट्रेस असतील, असे बोलले जात आहे. या अभिनेत्रींना चित्रपटाच्या कथेत महत्त्वपूर्ण भूमिका असतील आणि दोघींचा अ‍ॅक्शन सीन  देखील खास असू शकतात. या दोघी अभिनेत्री कोण असतील, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण चाहत्यांच्या मनात याबद्दल अनेक तर्क वितर्क सुरू आहेत.  

'धूम 4' च्या शूटिंगची तयारी 2025 च्या एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनर खाली येणारी 'धूम' फ्रँचायझीतील मागील चित्रपटांमध्ये 'धूम 3' ने 557 कोटींची कमाई केली होती आणि त्यामुळे या फ्रँचायझीला एक वेगळेच स्थान मिळाले. त्यानंतर 'धूम 2' आणि 'धूम' यांमध्येही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले होते. या यशाचा वारसा 'धूम 4' मध्ये कायम ठेवला जाईल, अशी अपेक्षा आहे. 

'धूम 4' च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रॉडक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी नवीन तंत्रज्ञान आणि सर्वात मोठे अ‍ॅक्शन सीन रचण्याचा विचार केला आहे. तसेच, या चित्रपटात एक वेगळीच स्टाइल आणि म्युझिक थिम असेल. संगीतकार अजय-अतुल या चित्रपटासाठी काही नवीन आणि थोडे हटके संगीत रचना करत आहेत.

हे ही वाचा: श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?

याशिवाय 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या कथेमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचा रोमँटिक ड्रामा कथेमध्ये दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असलेल्या या चित्रपटाची रिलीज 20 मार्च 2026 रोजी होईल. याशिवाय, रणबीरचा 'अ‍ॅनिमल' सुद्धा एक जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर असेल, ज्यामध्ये त्याच्या अभिनयाचे एक वेगळे रूप दिसले. 

रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटांमुळे त्याच्या चाहत्यांना एकापाठोपाठ अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची ओढ लागणार आहे. 'धूम 4' यातील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण यशराज फिल्म्सची लोकप्रियता आणि रणबीरचा अ‍ॅक्शन सिनेमा एकत्र येणाऱ्या वेळेस एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देईल.