राणा दग्गुबत्तीकडून सगळ्यांसमोर पत्नीला Kiss, व्हायरल व्हिडिओ

अभिनेता राणा दग्गुबतीने 8 ऑगस्ट 2020 रोजी मिहिका बजाजसोबत लग्न केलं.

Updated: Nov 22, 2021, 03:17 PM IST
राणा दग्गुबत्तीकडून सगळ्यांसमोर पत्नीला Kiss, व्हायरल व्हिडिओ title=

मुंबई : अभिनेता राणा दग्गुबतीने 8 ऑगस्ट 2020 रोजी गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लग्न केलं. या लग्नाचा एक  व्हिडिओ मिहिका बजाजने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राणा दग्गुबती आणि मिहिका दोघंही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

समोर आलेल्या या व्हिडिओबद्दल बोलताना. मिहिकाने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची झलक एका थ्रोबॅक व्हिडिओद्वारे दाखवली आहे. हळदीपासून ते संगीत आणि तिच्या  लग्नापर्यंत. या व्हिडिओमध्ये राणाला त्याची वधू मिहिकासोबत पोज देताना आपल्या आनंदावर नियंत्रण ठेवता येत नसल्याचं दिसून येतंय. यादरम्यान, राणा त्याच्या सगळ्या लग्नसोहळ्यांमध्ये प्रत्येक क्षणी आपल्या पार्टनरसोबत दिसते. लग्न झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना किस करत असल्याची झलकही व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली.

या कपलच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि ते जोरदार शेअरही करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत मिहिकाने लिहिलंय की, ''परफेक्ट मॅच. तुम्ही सगळं योग्य गोष्टींनी बनलेली व्यक्ती आहात. प्रेम. प्रकाश. आयुष्य."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऑगस्ट २०२१ मध्ये, राणा आणि मिहिका त्यांच्या पहिल्या एनिवर्सरी निमित्त त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आली होती. पतीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत मिहिकाने लिहिलं की, ''हॅप्पी  एनिवर्सरी माय लव्ह. हे सगळ्यात आनंदित वर्ष होतं. मी तुझ्यावर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रेम करते आणि त्याहूनही जास्त प्रेम करते. स्वतःसारखं असण्याबद्दल आणि वंडरफुल व्यक्ती असल्याबद्दल धन्यवाद. हे आयुष्यभरासाठी आहे...