'Amitabh Bachchan यांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली', Raju Srivastav यांच्या मुलीची भाविनक पोस्ट

Raju Srivastav:  ...आणि त्यांचा कुटुंबियाच्या या संकटात मेगास्टार अमिताभ बच्चन (Megastar Amitabh Bachchan) मोठा आधार होते.  

Updated: Sep 28, 2022, 11:31 AM IST
 'Amitabh Bachchan यांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली', Raju Srivastav यांच्या मुलीची भाविनक पोस्ट title=
raju srivastav daughter emotional note for amitabh bachchan nm

Raju Srivastav: प्रत्येकाला हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव (Famous comedian and actor Raju Srivastava) यांच्या निधनामुळे सगळ्यांचे डोळे पाणावले. जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला. 

राजू श्रीवास्तव आणि त्यांचा कुटुंबियाच्या या संकटात मेगास्टार अमिताभ बच्चन (Megastar Amitabh Bachchan) मोठा आधार होते.  राजू श्रीवास्तव अमिताभ बच्चन यांना आपले 'गुरू' मानलं होते. म्हणून राजू श्रीवास्तव यांनी मोबाईलमध्ये अमिताभ यांचा नंबर 'गुरुजी'च्या (Guru ji) नावाने सेव्ह केला होता. राजू श्रीवास्तव जेव्हा दिल्लीच्या एम्समध्ये (Delhis AIIMS) व्हेंटिलेटरवर बेशुद्ध होते आणि डोळे उघडत नव्हते आणि काही बोलत नव्हते, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांना एक ऑडिओ संदेश पाठवला होता. त्या संदेशावर प्रतिक्रिया देत राजू श्रीवास्तव यांनी काही सेकंद डोळे उघडले. पण नंतर बंद. आणि ते बंद डोळे पुन्हा उघडले नाहीत. 

या कठीण प्रसंगाता अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या आधार कुटुंबीय विसरले नाहीत. राजू श्रीवास्तव यांची मुलगी (Rajus Srivastava daughter Antaras) अंतरा (Antara) हिने अमिताभ बच्चन यांना भावनिक चिठ्ठी लिहून त्यांचे आभार मानले आहेत. अंतराने वडील राजू श्रीवास्तव यांच्या सोशल मीडिया हँडलवर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे राजूचे काही फोटो शेअर केले आहेत.  त्यासोबतच अमिताभ यांचा ब्लॉगही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि राजूच्या रूपाने मित्र गमावल्याबद्दल लिहिले आहे. 

अंतरा श्रीवास्तव यांनी चिठ्ठीत लिहिले आहे की, 'या कठीण काळात प्रत्येक क्षणी आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी अंकल अमिताभ बच्चन यांचे आभार मानू इच्छिते. तुमच्या प्रार्थनेने आम्हाला खूप बळ आणि आधार दिला आहे, जो आम्ही कायम लक्षात ठेवू. तुम्ही माझ्या वडिलांचा आदर्श, त्यांची प्रेरणा, प्रेम आणि मार्गदर्शक होतो.